अरे बापरे बाप..! त्या अल्पवयीन मुलीचे लग्न होता होता थांबले..आधार सामाजिक संस्था व प्रशासनाच्या सतर्कतेला यश ..मुलीचे आई-वडिल व नातलगांचा केला ब्रेन वॉश


अरे बापरे बाप..! त्या अल्पवयीन मुलीचे लग्न होता होता थांबले..आधार सामाजिक संस्था व प्रशासनाच्या सतर्कतेला यश ..मुलीचे आई-वडिल व  नातलगांचा केला ब्रेन वॉश 


अमळनेर दि.५(प्रतिनिधी)जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे, ४ मे २०२५ रोजी  चोपडा येथील १६ वर्षीय मुलगी आणि धरणगाव येथील २२ वर्षीय मुलाचा विवाह दिनांक ५ मे २०२५ रोजी धरणगाव येथे होणार होता. मात्र, हळदीचा कार्यक्रम ४ मे २०२५ सायंकाळी निश्चित असताना, आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर येथील प्रतिनिधी यांना गोपनीय माहिती मिळाली. अमळनेर चे उपविभागीय अधिकारी  नितीनकुमार मुंडावरे यांना देण्यात आली.प्रांत अधिकारी यांच्या सूचनेनुसार मुलगी अल्पवयीन असल्याने आवश्यक कारवाई करण्यात आली.

नायब तहसीलदार  लक्ष्मण सातपुते ग्राम महसूल अधिकारी  राहुल ढेरंगे पोलिस उपनिरीक्षक  संतोष पवार, पोलिस कॉन्स्टेबल सुमित बाविस्कर, आणि पोलिस नाईक उमेश पाटील  यांच्या उपस्थितीत मुलीच्या आई-वडिलांना व इतर नातलगांना बाल विवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देऊन समुपदेशन केले गेले.अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांना लेखी समजही देण्यात आली.त्यामुळे ५ मे २०२५ रोजी होणारा बालविवाह थांबविण्यात आला आहे. 

सदर कारवाई  उपविभागीय अधिकारी  मनीष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी आणि पोलिस निरीक्षक श्री पवन देसले तसेच आधार संस्थेचे अध्यक्ष डॉ.भारती पाटील संचालिका रेणू प्रसाद ,जिल्हा प्रकल्प समन्वयक आनंद पगारे,निवेदिता ताठे, मोहिनी धनगर यांच्या सहकार्याने करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने