आमदारांसह प्रशासन अधिकाऱ्यांचा ताफा सकाळी सकाळी शेतावर ..अडावद,धानोरा परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान.. तात्काळ पंचनाम्याच्या सुचना

 आमदारांसह प्रशासन अधिकाऱ्यांचा ताफा  सकाळी सकाळी शेतावर ..अडावद,धानोरा परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान.. तात्काळ पंचनाम्याच्या सुचना

चोपडा दि.७(प्रतिनिधी) काल दिनांक ६ मे रोजी सायंकाळी वादळी वारे व अवकाळी पाऊसामुळे धानोरा व अडावद मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याची पाहणी आज सकाळी नऊ वाजेपासून आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे,निवासी उपजिल्हाधिकारी श्री गजानन पाटोळे,उपविभागीय अधिकारी अमळनेर श्री नितीन कुमार मुंडावरे यांनी करीत  आहेत.
देवगाव,पुनगाव, धानोरा, लोणी पंचक, खर्डी, बिडगाव या गावांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली असता केळी व पपई या पिकांची नुकसान झालेले आहे.यावेळी वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या, पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने कंपनीशी टोल फ्री क्रमांक वर किंवा ई सेवा केंद्र येथून ऑनलाईन तक्रारी कराव्यात असे देखील सूचित केले,बाधीत शेतकरी यामधून वगळला जाणार नाही याबाबत दक्षता घेण्याबाबत निर्देश देण्यात आले,
तालुक्यातील इतर गावांमध्ये देखील शेती पिकांची व घरांचे नुकसान झालेले असून त्याची पाहणी संबंधित तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक करत‌ आहेत...
भविष्यात शासनाकडून वितरित होणाऱ्या अनुदानासाठी ऍग्री स्टॅक नोंदणी बंधनकारक असल्याचे शेतकरी यांना सुचित करण्यात आले.नुकसान झालेल्या सर्व शेतकरी ग्रामस्थ यांचे पंचनामे केले जातील याबाबत तहसीलदार , गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी नियोजन कलेले आहे.
दौऱ्या दरम्यान तहसीलदार भाऊसाहेब थोरात,
प्रभारी तालुका कृषी अधिकारी रामचंद्र पाटील,
प्रभारी गट विकास अधिकारी अनिल विसावे,
संबंधित गावांची तलाठी,मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक उपस्थित होते...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने