आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुराव्याने आता व्यायामशाळेसाठी मिळणार १४ लाखांचे अनुदान

 

आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुराव्याने आता व्यायामशाळेसाठी  मिळणार १४ लाखांचे अनुदान

चोपडा दि.६(प्रतिनिधी):-देश असो व राज्याची प्रगती यात युवकांचे अनमोल असे योगदान असते त्याकरता युवापुढी सक्षम होणे नितांत गरजेचे आहे. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गावागावात व्यायाम शाळा व्हाव्यात व त्यासाठी भरीव निधी मिळावा याकरिता आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री मा.‌ना.श्री. अजितदादा पवार व क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा.ना. श्री. दत्तामामा भरणे यांच्याकडे सतत पाठपुरावा चालू ठेवला होता.त्यांच्या मागणीकडे शासनाने लक्ष वेधत आता व्यायामशाळेसाठी शासनाने १४लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.त्यामुळे आता व्यायामशाळा नवीन रूप धारण करून शरीर कसरतीं करिता  युवकांना फार लाभ होणार आहे.
शहरी व ग्रामीण भागात चांगले खेळाडू निर्माण व्हावे, यासाठी राज्य शासनाचे क्रीडा धोरण अंमलात आणले आहे. शहरी व ग्रामीण भागात व्यायाम शाळा निर्माण करण्यासाठी यापूर्वी ७ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत होते. मात्र या अनुदानात चांगल्या व्यायाम शाळेची निर्मिती होत नव्हती हे लक्षात घेऊन आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांनी अत्याधुनिक व्यायाम शाळेसाठी भरघोस निधीची गरज असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले.त्यांच्या मागणीला हिरवा कंदील देत १४लाखांची निधी देण्याचे शासकिय परिपत्रक जारी केले आहे.
      राज्यात २०१२ मध्ये क्रीडा धोरण अंमलात आले. यापूर्वी व्यायाम शाळेसाठी दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते.त्यानंतर हे अनुदान ७ लाखवर गेले.तेही तोकडे असल्याचे आमदार यांनी पटवून दिल्यावर उपरोक्त निर्णय घेण्यात आला आहे.व्यायाम शाळा उभारणीसाठी लागणारा खर्च व वाढलेल्या साहित्याच्या किमती यामुळे व्यायाम शाळेसाठी अनुदान वाढविणे गरजेचे असल्याची मागणी   आ.प्रा.श्री.सोनवणे यांनी शासनस्तरावर लावून धरली  त्याचे फलित म्हणून२३ एप्रिल २०२५ रोजी परिपत्रक निघून शासनाकडून नवीन निर्णयानुसार आता व्यायाम शाळेसाठीचे अनुदान १४ लाखांवर करण्यात आले आहे.

तरी व्यायाम शाळा उभारणीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावा लागतो. तो अर्ज थेट जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयातही सादर करता येतो. दरम्यान, जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून यासाठी संकेतस्थळदेखील उपलब्ध करून दिले आहे. याठिकाणी ऑनलाइन अर्ज देखील करता येऊ शकतो.तरी  जिल्ह्यांतील जास्तीत जास्त युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने