परीक्षेत स्नेहराज पाटील फिजिक्स विषयात राज्यात प्रथम

 

आय.सी.एस.ई. बोर्डाच्या दहावी परीक्षेत स्नेहराज पाटील फिजिक्स विषयात राज्यात प्रथम



चोपडा,दि.४(प्रतिनिधी) येथील आय.सी.एस.ई बोर्डाच्या चावरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावी परीक्षेत स्नेहराज नरेंद्रसिंग पाटील या विद्यार्थ्याने फिजिक्स विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. या परीक्षेत ९७.४% गुण मिळवून चावरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रथम क्रमांक मिळवून यशाचे शिखर गाठले. 

घोडगाव येथील सी.बी निकुंभ माध्य.व उच्च माध्य. विद्यालयातील प्रा.नरेंद्रसिंग रणजित पाटील व जि.प.प्राथमिक शाळा, गोरगावले येथील श्रीमती सरला विजयसिंग राजपूत यांचा स्नेहराज हा मुलगा आहे. त्याच्या नेत्रदीपक यशाबद्दल नूतन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी, उपाध्यक्ष द्रविलाल पाटील, सचिव जवरीलाल जैन, संचालक मंडळ, मुख्याध्यापक आर.पी.चौधरी पर्यवेक्षक व्ही.ए.नागपुरे, चावरा इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य बीजू कोटयाकल, सन्मती जैन, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने