राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी( अजित पवार) पक्षात खान्देशातून २ माजी मंत्र्यांसह ३माजी आमदारांचा पक्ष प्रवेश ♦️ माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतिष पाटील, माजी आमदार कैलास बापू पाटील, माजी आमदार प्रा दिलीप सोनवणे व माजी आमदार शरद पाटलांचा समावेश


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी( अजित पवार) पक्षात खान्देशातून २ माजी मंत्र्यांसह ३माजी आमदारांचा पक्ष प्रवेश 

♦️ माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतिष पाटील, माजी आमदार कैलास बापू पाटील, माजी आमदार प्रा दिलीप सोनवणे व माजी आमदार शरद पाटलांचा समावेश 

मुंबई दि.४ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  ना. श्री. अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष  खा. श्री. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये आज भव्य पक्षप्रवेश पार पडला. यावेळी, माजी मंत्री श्री. गुलाबराव देवकर, माजी मंत्री श्री. सतीश पाटील, माजी आमदार  श्री. कैलास पाटील, माजी आमदार  श्री. दिलीपराव सोनवणे,  माजी आमदार  श्री. प्रा. शरद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उत्तर विभागीय अध्यक्षा श्रीमती तिलोत्तमाताई पाटील, पुणे येथील श्रीमती जाहिदा मोदी पठाण, तळोदा (जिल्हा नंदुरबार)पंचायत समिती सभापती श्री. यशवंत ठाकरे, महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक पणन महासंघ मुंबई संचालक श्री. सुरेश चिंचोळकर यांनी पक्षात आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी संभाजी ब्रिगेडमधील शेकडो कार्यकर्त्यांनी देखील पक्षात प्रवेश केला.

सत्तेचा वापर हा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करावा, असा सल्ला यावेळी अजितदादांनी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना दिला. तसेच भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी सर्वांनी एकत्र येऊन कामाला लागायचे आहे, असे देखील अजितदादा म्हणाले. राजकीय जीवनात कधीच कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, असे सांगत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी नेहमीच सामान्य लोकांचा विकास होईल यासाठी प्रयत्न करावे असे अजितदादा म्हणाले.

या कार्यक्रमास मंत्री  ना. श्री. माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री  ना. श्री. इंद्रनील नाईक, आमदार  श्री. शिवाजीराव गर्जे, माजी मंत्री आमदार श्री. अनिल भाईदास , आमदार श्री. अमोल मिटकरी, प्रदेश उपाध्यक्ष  श्री.  प्रमोद हिंदुराव, प्रदेश उपाध्यक्ष  श्री. वसंतराव घुईखेडकर,  प्रदेश प्रवक्ते  श्री. संजय तटकरे, ज्येष्ठ नेत्या श्रीमती सुरेखा ठाकरे, युवक प्रदेशाध्यक्ष  श्री. सुरज चव्हाण,प्रदेश सरचिटणीस  श्री. लतिफ तांबोळी, सहकोषाध्यक्ष श्री. संजय बोरगे, जळगाव जिल्हाध्यक्ष  श्री. संजय पवार, धुळे जिल्हाध्यक्ष  श्री. सुरेश सोनवणे,  श्री. नंदुरबार जिल्हाध्यक्ष  श्री. अभिजीत मोरे, रावेर लोकसभा अध्यक्ष,   श्री. उमेश नेमाडे,जळगाव ग्रामीण कार्याध्यक्ष श्री. योगेश डेसले आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने