1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते विविध शासकीय दाखले, धनादेश व साहित्य वाटप

 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते विविध शासकीय दाखले, धनादेश व साहित्य वाटप 

चोपडा दि.१(प्रतिनिधी )आज दिनांक 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसानिमित्त आ.प्रा. श्री. चंद्रकांत बळीराम सोनवणे, चोपडा विधानसभा मतदारसंघ यांच्या हस्ते नविन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय चोपडा येथे ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर आमदार महोदय यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान शुभारंभ करण्यात येऊन विविध विभागांतील अनेक लाभार्थ्यांना धनादेश, शासकीय कागदपत्रे वा  ट्रॅक्टर सारखे साहित्य वाटप करण्यात आले.

याप्रसंगी आमदार महोदय यांच्या हस्ते शहीद जवान पत्नी श्रीमती. निता नाना सैंदाणे यांना शासकीय जागा वाटप केल्याबाबत मौजे बोरअजंटी येथील गट नं. 125/1/1 चे 7/12 व फेर फार पत्रक वाटप करण्यात आले.मयत स्वातंत्र्य सैनिक गोपीबेन गुजराथी यांच्या सन्मान निधी फरक र. रु. 774183/- चा धनादेश त्यांचे वारस श्री. मंगेश गुजराथी यांना वाटप करण्यात आला. चोपडा शहर पो स्टे हददतीतील मौजे गोरगावले रस्त्यावर लहान मुलीवर अतिप्रसंगाच्या परिस्थितीतून धैर्याने सामोरे जावून सदर मुलीला वाचविले त्याबाबत श्री. यश रविंद्र चौधरी यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. माहे मे 2021 मध्ये वादळी वारा व पाऊस झालेने घरपडझड झालेल्या एकूण 5 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व धनादेश वाटप करण्यात आले.BSNL यांना चोपडा तालुक्यात एकूण 16 ठिकाणी मोबाईल टॉवर उभारणीसाठी वाटप झालेल्या शासकीय जागेचे 7/12 व फेरफार पत्रक श्री. निकम साहेब, उपअभियंता यांना देण्यात आले. कुटुंब अर्थ सहाय्य योजना अंतर्गत 9 लाभार्थी यांना मंजुरी पत्र व धनादेश वाटप करण्यात आले. संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत 5 लाभार्थी यांना मंजुरी पत्र वाटप करण्यात आले. श्रावण बाळ सेवा योजना अंतर्गत 2 लाभार्थी यांना मंजुरी पत्र वाटप करण्यात आले.इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना अंतर्गत 12 लाभार्थी यांना मंजुरी पत्र वाटप करण्यात आले.इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना अंतर्गत 5 लाभार्थी यांना मंजुरी पत्र वाटप करण्यात आले.  जिवंत 7/12 मोहिमेअंतर्गत एकूण 6 खातेदार यांना 7/12 व फेरफार पत्रक वाटप करण्यात आले.  पुरवठा शाखेतील विविध योजनेतील रेशनकार्ड धारकांना प्रातीनिधीक स्वरुपात एकूण 10 मंजूर रेशन कार्ड वाटप करण्यात आले. चोपडा तालुक्यातील एकूण 10 मंजुर जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले लाभार्थी यांना वाटप करण्यात आले.कृषी विभागामार्फत योजनेतील मंजूर लाभार्थी शेतकरी यांना एकूण 5 शेतीकामासाठी ट्रॅक्टर वाटप करण्यात आले.

        यावेळी श्री नरेंद्र पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा ,श्री भाऊसाहेब थोरात तहसीलदार चोपडा,उपविभागीय पोलीस अधिकारीश्री. सानप  ,पोलीस निरीक्षक मधुकर साळवे ,पीआय कावेरी कमलाकर मॅडम, श्री अनिल विसावे गटविकास अधिकारी,  मुख्याधिकारी राहुल पाटील ,नामदेव पाटील अध्यक्ष लाडकी बहिण योजना,रावसाहेब पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा,गोपाल पाटील, शिवराज पाटील, विजय पाटील ,किरण देवराज, विकास पाटील  , योगेश पाटील नायब तहसीलदार ,श्री डी आर सैंदाणे ,नायब तहसीलदार सचिन बांबडे  ,नायब तहसीलदार  दाभाडे मॅडम, दीपक साळुंखे तालुका कृषी अधिकारी ,डॉक्टर प्रदीप लासुरकर तालुका वैद्यकीय अधिकारी, संतोष पाटील ,राजेंद्र पाटील, प्रताप पाटील ,मंगल इंगळे, प्रल्हाद कोळी, मंगल पाटील ,कैलास बाविस्कर ,गणेश पाटील तसेच नागरिक व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने