सुट्टीच्या दिवशीही तहसीलदार भाऊसाहेब राऊत यांनी उघडला माणूसकीचा दरवाजा अन् हे केले स्तूत्य काम..
चोपडा दि.२७(प्रतिनिधी)तालुक्यातील वेले येथील श्री शिवदास रामदास सोनवणे यांची कुटुंबातील मुलीला कॅन्सर असल्याचे निदान झाल्यानंतर* संबंधितांना आर्थिक अडचणीमुळे उपचारासाठी शिधापत्रिका ची आवश्यकता होती ,मात्र ती त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांनी शनिवार सुट्टी असताना तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधला असता तहसीलदार भाऊसाहेब थोरात प्रभारी पुरवठा अधिकारी श्री योगेश पाटील व संगणक चालक श्री शशीकांत जमादार यांनी त्यांच्याकडून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन त्यांना ई शिधा पत्रिका वितरित केली...
सदर ई शिधापत्रिका ही अन्नसुरक्षा योजनेसाठी पात्र असल्यामुळे त्या आधारे वैद्यकीय उपचार देखील घेणे शक्य होणार आहे.अधिकारी व कर्मचारी यांच्या तत्पुरतेमुळे संबंधित कुटुंबाचे कुटुंब प्रमुख व अन्य सदस्यांनी सहकार्याबद्दल प्रशासनाचे धन्यवाद व्यक्त केले आहेत...
प्रकरणातील मुलगी नंदिनीचे वय ११ वर्षे असून पुढील उपचारासाठी ती कुटुंबासह जळगावाला रवाना झाली आहे,तेथील उपचार नंतर ती मुंबईला रवाना होणार आहे...