प्रेम विवाहाचा गुत्था अन् जन्मदात्या पित्याकडून गोळ्या घालून मुलीची हत्या..जावाई रक्ताच्या थारोळ्यात चोपड्यात हळदीच्या कार्रायक्रमातच थरार
चोपडा दि.२७ (प्रतिनिधी) : प्रेम विवाह वेदनादायक वाटल्याने बापानेच पोटच्या पोरीवर गोळ्या झाडून खून केल्याची अमानुष घटना घडली.यात जावयालाही गोळ्या लागल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडून चिंताजनक स्थितीत गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मारेकरी बाप हा सेवानिवृत्त पोलिस अधिकारी असून त्यासही संतापलेल्या जमावाने जबर मारहाण केल्याने रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.चोपडा शहरातील डॉ. आंबेडकर नगर येथे हळदीच्या कार्यक्रमात हे हत्याकांड घडून आले आहे.याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत तरुण, विवाहितेचे नाव तृप्ती अविनाश वाघ (वय २५, रा.डहाणूकर रा.डहाणूकर कॉलनी, कोथरूड, पुणे) असे आहे. तर तिचा पती अविनाश ईश्वर वाघ (वय २६) हे गंभीर जखमी झाले आहेत. मयत तृप्ती वाघ हिच्या सासू प्रियंका ईश्वर वाघ (वय ४५ रा. पुणे) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात हळदीचा कार्यक्रमासाठी शनिवारी पुण्यातून अविनाश वाघ व त्याचा परिवार आला होता. याबाबतची माहिती संशयित आरोपी तथा अविनाश वाघ यांचे सासरे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी किरण अर्जुन मंगळे (वय ५५ रा. शिरपूर जि. धुळे) यांना मिळाली होती. त्यांनी चोपडा येथे येऊन शनिवारी दि. २६ एप्रिल रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास मुलगी तृप्ती वाघ व जावई अविनाश वाघ यांच्यावर परवाना असलेल्या बंदुकीतून बेछूट गोळीबार केला.
यात मुलगी तृप्ती वाघ ही जागीच मृत्युमुखी पडली तर जावई अविनाश याला पाठीवर हातावर गोळी लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी संतप्त होऊन संशयित आरोपी किरण मंगळे याला बेदम मारहाण करून पब्लिक मार दिला. चोपडा शहर पोलिसांना घटनेची माहिती करताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी तृप्ती वाघ हिचा मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला तर जावई अविनाश वाघ व जखमी किरण मंगळे यांना उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
प्रियंका ईश्वर वाघ यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी किरण अर्जुन मंगळे (वय ५५) आणि त्यांचा मुलगा निखिल किरण मंगळे (वय २२) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गोळीबाराच्या घटनेमुळे चोपडा शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी अण्णासाहेब घोलप यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे स्वतः करीत आहेत

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,तृप्ती अविनाश वाघ (२४) हिने दोन वर्षापूर्वी अविनाश ईश्वर वाघ (२८) दोघे रा. करवंद, शिरपूर, ह. मु. कोथरूड, पुणे) या दोघांनी प्रेमविवाह केला होता. परंतु तृप्तीचे वडील यांना हा विवाह मान्य नव्हता.चोपडा येथे बहिणीकडील विवाह समारंभासाठी अविनाश आणि तृप्ती हे शनिवारी आले असता संशयित
आरोपी किरण अर्जुन मंगले (४८, रा. शिरपूर) याने हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर किरण व तृप्ती हे समोर आले असता त्यांना पाहताच बाप किरण मांगले याने त्याच्याकडील रिव्हॉल्वरमधून आपल्या मुलीवर गोळी झाडून तिचा खून केला.या घटनेत पत्नी तृप्तीला वाचविण्यासाठी पती अविनाश गेला असता तोही गोळी लागून जबर जखमी झाला आहे,त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी रात्री चोपडा शहरात येऊन माहिती जाणून घेत पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांना सूचना केल्या. याबाबत शहर पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.