नवी दिल्ली येथे आशियाई योगसाधना चॅम्पियनशिपमध्ये चोपड्याच्या ऋग्वेद पाटीलची चमक
चोपडा दि.२७(प्रतिनिधी)नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये २० देशातील योगसाधकांनी सहभाग घेतलेल्या दुसऱ्या आशियाई योगसाधना चॅम्पियनशिपमध्ये जिल्ह्यातील गोरगावले बु।। येथील ऋग्वेद प्रदीप पाटील याने योग प्रकार – आसन व रिदम प्रकारातील सादरीकरण करुन पदक पटकावले आहे.
ऋग्वेद या पोलीस निरीक्षक कै.लक्ष्मण आनंदा पाटील यांचा नातू आहे.दि. २५ ते २७ एप्रिल दरम्यान नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियन येथे जगातील भारतासह नेपाळ, हाँगकाँग, चीन, आफ्रिका, दुबई, जपान, तुर्कस्तास सिंगापूर यांच्यासह २० देशा पेक्षा जास्त देशाची योगसाधकांची उपस्थिती असलेल्या २ ऱ्या आशियाई योगसाधना चॅम्पियनशिपमध्ये चोपडा तालुक्यातील गोरगावले बु।। येथील पोलीस निरीक्षक कै.लक्ष्मण आनंदा पाटील यांचा नातू व संगमनेर येथील ध्रुव ग्लोबल स्कूलचा विद्यार्थी ऋग्वेद प्रदीप पाटील याने योग प्रकार – आसन व रिदम प्रकारात पदक पटकावले आहे
यावेळी अध्याय योगिजी स्वामी रामदेव बाबा, ग्लोबल योग आयकॉन आणि डॉ. मनसुख मांडविया, मा. प्रिय युवा कार्य व क्रीडा मंत्री तथा खासदार सौ. रक्षा खडसे, युवा वा कार्य क्रीडा मंत्री, सौ. सुजाता चतुर्वेदी सचिव क्रीडा विभाग भारत सरकार साधावी देव प्रियाजी डीन पतंजली विद्यापीठ विश्वास मंडलिक गुरुजी प्रथम पतप्रधान योग पुरस्कार विजेते डॉ. जयदीप आर्य आणि विश्व योग महासंघाचे अध्यक्ष डॉ. जयदीप आर्य योग महासंघाचे अध्यक्ष डॉ.श्री उदित शेठ अध्यक्ष योगासन इंडिया श्री डॉ उमंग डॉन सरचिटणीस आशियाई भारत
मान्यवरत गजेंद्र सिंह शेखावत युनियन मिनिस्टर कलचअर व टुरिझम मिनिस्टर भारत सरकार आदी मान्यवर उपस्थित होते.