आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत फडकला प्रतापचा झेंडा
चोपडा दि.२४(प्रतिनिधी)रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई आयोजित, आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा प्रताप विद्या मंदिर, चोपडा येथील केंद्रावर फेब्रुवारी 2025 संपन्न झाली होती.एकूण ९ कला प्रकारात १ली ते १२वी च्या ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थ्यांना (इंटरनॅशनल लेवल अप्रतिम 16 ट्रॉफी, 22 उत्कृष्ट मेडल, 7 आकर्षक कन्सोलेशन प्राईस ) पारितोषिके मिळाले.
कार्यक्रम प्रसंगी ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.सुनील बारी सर तसेच जळगावचे सुप्रसिद्ध चित्रकार प्रेमकुमार शिवराम सपकाळे हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले. संस्था समन्वयक श्री.गोविंद गुजराथी, मुख्याध्यापक श्री .पी.एस.गुजराथी, उपमुख्याध्यापक श्री.पी.डी.पाटील, उपप्राचार्य श्री जे एस शेलार, पर्यवेक्षक श्रीमती माधुरी पाटील , पर्यवेक्षक श्री.ए.एन.भट, कलाशिक्षक श्री.पंकज नागपुरे ,कलाशिक्षक श्री.कमलेश गायकवाड ,संगीत शिक्षक श्री .पी बी कोळी सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली. वरील स्पर्धेत स्केचिंग, रंगभरण, कोलाज,मुद्राचित्र ,हस्ताक्षर, टॅटू, कार्टून, ग्रीटिंग कार्ड , फोटोग्राफी या कलाप्रकारात विद्यार्थ्यांनी यश संपादन केले संपूर्ण जगात भारतासह रशिया ,दुबई, भूटान, टंजानिया या देशांमध्ये एकाच वेळेस ही स्पर्धा घेण्यात आली होती. या दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन रंगोत्सव सेलिब्रेशनचे इव्हेंट डायरेक्टर व कलाशिक्षक श्री.पंकज ए. नागपुरे व इव्हेंट डायरेक्टर- श्री.कमलेश ए. गायकवाड यांनी केले.या यशाबद्दल संस्थेतील सर्व घटकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .एजाज सर यांनी केले. तर इशस्तवन संगीतशिक्षक पी बी कोळी सर यांनी सादर केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम एफ माळी सर, जयेश पोद्दार ,राजेंद्र शिरसाट, राहुल महाले, सईद खाटीक यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना मिळालेले पुरस्कार पाहून पालकांना आनंद व समाधान लाभले. उपमुख्याध्यापक श्री पि डी पाटील सर यांनी त्यांच्या खास शैलीत सर्व मान्यवरांचे आभार मानले. व या नेत्रदीपक कार्यक्रमाची सांगता झाली.