भाग्योदय , तारामती व सहयोग नगर भागात मोबाईल रेंज ला प्रॉब्लेम..! ग्राहकांत प्रचंड संताप..
चोपडा (प्रतिनिधी) शहरातील काही भागात मोबाईल रेंज पकडत नसल्याने ग्राहकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे अनेकवेळा तक्रार करूनही कंपनी दखल घेता नसल्याने ट्राय ने किंवा ग्राहक संघटनेने पुढे येण्याची नितांत गरज असून ग्राहकांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
शहरातील भाग्योदय नगर, तारामती, सहयोग नगर इत्यादी परिसरात गेल्या सहा महिन्यांपासुन सर्वच मोबाईल कंपन्यांची नेटवर्क सेवा कोलमडलेली असून मोबाईल कनेक्टिव्हिटी होत नाही, ड्रॉप कॉल भरपूर होतात, काही कॉल सुरू असतानाच वनवे होतात, सर्वर वारंवार डाऊन होतात, मेसेज डाऊनलोड प्रॉब्लेम जास्त आहेत. आदींबाबत तक्रारी करून काहीही उपयोग होत नाही. कृपया ट्राय ने व ग्राहक संघटनांनी यात लक्ष घालावे अशी मागणी परिसरातील मोबाईल सिमकार्ड धारक ग्राहक व नागरिकांची केली आहे.
