मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभाग बैठक संपन्न - उमेश रटाटे
तळेगाव दाभाडे दि.१३(प्रतिनिधी): मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे एम आय डी सी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार उद्योग विभाग बैठक पार पडली. नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस महेंद्र शेलार यांनी बैठकीचे आयोजन केले होते. तालुका उपाध्यक्ष उमेश रटाटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अभिजीत आपटे यांनी उपस्थितांना उद्योग विभाग विभाग तर्फे उद्योजक व्यापारी व्यावसायिक यांना संघटीत करून औद्योगिक समस्या आणि उपाय जाणून घेण्यासाठी उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, बचतगटांच्या बैठका घेऊन शासनाची धोरणे, योजना तालुक्यात विविध भागात पोहोचवण्याचे आवाहन केले तसेच मार्गदर्शनासाठी बोलवाल तेथे पोहोचण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री सुभाष मालपाणी व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री चैतन्य जोशी ऑनलाइन बैठकीमध्ये सामील झाले यावेळी प्रदेशाध्यक्षांना बैठकीचा वृत्तांत सांगण्यात आला. यावेळी या बैठकीचा मुख्य उद्देश वडगाव मावळ येथे उद्योग मेळावा आयोजित करण्यासाठी नियोजन करण्यात आले. मंगळवारी मावळ चे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या कार्यालयात भेट देवून मेळाव्याची तारीख वेळ तसेच कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर केली जाईल. यावेळी इंजिनिअर सेल चे मावळ तालुका अध्यक्ष श्री सतिश कचरे, ज्ञानेश्वर वाघमारे, सागर वाणी, स्थानिक व्यापारी उपस्थित होते.
