चोपड़ा तालुक्यात काही भागा मध्ये गारपीठ सह अवकाळी पाऊस....!
चोपड़ादि.१३ (प्रतिनिधि ) -- तालुक्यात वातावरणात दर तासाला बदल होत होता दोन दिवसांपासून उकाळा कमी अधिक होत होते त्यामुळे पावसाची हजेरी केव्हा लागेल हे सांगता येत नव्हते.
ढगाळ वातावरण मुळे अवकाळी पावसाची सऱ्या येथील हे निष्चित होते आज दुपारी दोन ते तीन च्या दरम्यान धानोरा, मितावली, पंचक, गोरगावले, खेडीभोकरी, माचला परिसरात अवकाळी पावसाची हजेरी सह गारपीठ झाली गारपीठ गोठयाचा आकाराच्या होत्या.जवळपास 15 ते 20 मिनिट ही गारपीठ झाली. ह्या गारपीठ मध्ये अनेक शेतकाऱ्याचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.पाऊस बंद झाल्या बरोबर शेतकरी वर्ग आपल्या शेता कड़े जावून बघण्यासाठी गेल्याचे बोलले जात होते. अवकाळी पावसाने मात्र शेतकरी भयभीत झाला आहे.
