डॉ. निवृत्ती पाटील बी. एच. एम. एस.प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
अमरावती येथे प्रमाणपत्र स्वीकारताना डॉ निवृत्ती पाटील
गणपूर( ता चोपडा) ता 24(प्रतिनिधी): येथील रहिवासी डॉ निवृत्ती प्रवीण पाटील याने अमरावती येथील तखतमल श्रीवल्लभ होमिओपॅथी कॉलेजमधून बी एच एम एस हा वैद्यकीय अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत पूर्ण केला. त्याचे प्राथमिक शिक्षण येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण चोपडा येथील कस्तुरबा विद्यालयात झाले आहे. नीट परीक्षेत उत्तीर्ण होऊन गव्हर्मेंट कोट्यातून त्याचा अमरावती येथील महाविद्यालयात प्रवेश झाला होता. साडेपाच वर्षात इंटर्नशिप सह त्याने बी एच एम एस ची पदवी प्राप्त केली. डॉ निवृत्ती पाटील येथील स्वस्त धान्य दुकानदार प्रवीण पाटील यांचा चिरंजीव असून तो एमडी या पुढील शिक्षणासाठी तयारी करणार आहे.त्याच्या या यशाबद्दल त्याचे विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे