राज्य टी.डी.एफ.चे पालघर येथे अधिवेशन

 टी.डी.एफ. च्या वतीने जळगांव जिल्ह्यातुन श्री एच जी इंगळे यांना"जीवन गौरव" तर श्री मंगेश भोईटे (चोपडा)व श्री.राजेंद्र शिंदे (एरंडोल) यांना "राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार" जाहीर

♦️२६ रोजी राज्य टी.डी.एफ.चे पालघर येथील अधिवेशनात होणार पुरस्कार वितरण 

=================


चोपडा दि.२२(प्रतिनिधी)टी.डी.एफ. च्या वतीने जळगांव जिल्ह्यातुन श्री एच जी इंगळे यांना ""जीवन गौरव"" तर श्री मंगेश भोईटे (चोपडा)व श्री.राजेंद्र शिंदे (एरंडोल) यांना ""राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार"" जाहीर झाला असून   महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) चे राज्यस्तरीय अधिवेशन रविवार,दिनांक-26 एप्रिल 2025 रोजी शिक्षण महर्षी स.तु.कदम विदयालय व कनिष्ठ महाविद्यालय, पालघर सकाळी-8.30 वाजता आयोजित करण्यात आले आहेत.त्यात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.

              सदरील अधिवेशन दोन सत्रात होणार असून यात महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवाशर्ती नियमावली, चौकशी समितीचे वास्तव व उपाय यावर शोधनिबंधाचे सादरीकरण, विविध पुरस्कारांचे वितरण नंतर खुले अधिवेशन अशी रूपरेषा असून या अधिवेशनात शिक्षण क्षेत्र, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात येणार असून जुनी पेन्शन योजना, अशैक्षणिक कामे, 15 मार्च 2025 संच मान्यता शासन आदेशातील निकषावर फेरविचार करणे, ऑनलाईन कामे कमी करणे, नवीन शैक्षणिक धोरण, सीबीएसई अभ्यासक्रम, शिक्षक-शिपाई भरती बंदी व समस्या राज्याच्या वरिष्ठासमोर मांडण्यात येणार असून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विविध ठराव मंजूर करण्यात येणार आहेत.तरी सदरील अधिवेशनास जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनी  यांनी बहुसंख्येने उपस्थितीचे आवाहन राज्य टी.डी.एफ. चे उपाध्यक्ष श्री आर एच बाविस्कर,कोशाध्यक्ष श्री निशांत रंधे,राज्य पदाधिकारी डॉ श्री एन डी नांद्रे,नाशिक विभाग टीडीएफ चे अध्यक्ष श्री संजय पवार सर,श्री आर आर पाटील यांनी केले आहे.

        यावेळी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी,टीडीएफ च्या वतीने जळगांव जिल्ह्यातुन श्री एच जी इंगळे यांना ""जीवन गौरव"" तर श्री मंगेश भोईटे (चोपडा)व श्री राजेंद्र शिंदे (एरंडोल) यांना ""राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार"" मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहेत

              सदरील पुरस्कार दिनांक-26 एप्रिल 2025 रोजी पालघर येथील महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी (टी डी एफ) च्या राज्यस्तरीय अधिवेशनात उदघाटक ना. श्री. एकनाथजी शिंदे  (उपमुख्यमंत्री-महाराष्ट्र राज्य), महाराष्ट्र टीडीएफ चे राज्याध्यक्ष  श्री जी के थोरात,  ना श्री दादाजी भुसे  (शालेय शिक्षणमंत्री-महाराष्ट्र राज्य),  ना श्री गणेशजी नाईक  (वनमंत्री तथा पालकमंत्री पालघर),  ना श्री उदयजी सामंत  (उद्योगमंत्री तथा पालकमंत्री-रत्नागिरी),  ना श्री पंकजजी भोयर  (शालेय शिक्षण राज्यमंत्री-महाराष्ट्र राज्य),  आ श्री ज्ञानेश्वरजी म्हात्रे  (शिक्षक आमदार-कोकण विभाग), आ श्री निरंजनजी डावखरे  (पदवीधर आमदार-कोकण विभाग),  आ श्री किशोरजी दराडे  (शिक्षक आमदार-नाशिक विभाग),  आ.श्री. सत्यजित तांबे  (पदवीधर आमदार-नाशिक विभाग), आ श्री जयंतजी आसगावकर साहेब(शिक्षक आमदार-पुणे विभाग),  आ श्री ज मो अभ्यंकर  (शिक्षक आमदार-मुंबई विभाग),  खा श्री हेमंतजी सावरा (खासदार-पालघर),  खा श्री भास्कररावजी भगरे सर (खासदार-दिंडोरी), मा श्री प्रसन्न जोशी (जेष्ठ पत्रकार- एबीपी माझा),  श्री सचिन्द्रजी प्रतापसिह साहेब (शिक्षण आयुक्त-महाराष्ट्र),  श्री संपतजी सुर्यवंशी (शिक्षण संचालक-महाराष्ट्र),महाराष्ट्र टीडीएफ चे कार्याध्यक्ष श्री नरसु पाटील,उपाध्यक्ष श्री आर एच बाविस्कर, कोषाध्यक्ष श्री निशांत रंधे, सदस्य डॉ श्री एन डी नांद्रे, नाशिक विभाग अध्यक्ष श्री संजय पवार व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला जाणार आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे जिल्ह्यातील विविध संघटना तसेच शिक्षक बांधवांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने