शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती, नवोपक्रम स्पर्धेतील जिल्हास्तरीय विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण
जळगाव दि.४(प्रतिनिधी) नुकत्याच जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे महाराष्ट्र शासनामार्फत राबविल्या गेलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती, नवोपक्रम स्पर्धेतील जिल्हास्तरीय विजेत्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम जळगाव जिल्ह्याच्या सीईओ मीनल करणवाल मॅडम, माननीय श्री संजय सावकारे महाराष्ट्र राज्य वस्त्र उद्योग मंत्री, माननीय श्री किशोर आप्पा पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण मॅडम, जळगाव डाएट चे प्राचार्य श्री झोपे सर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नखाते साहेब, यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
या कार्यक्रमात दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती या स्पर्धेतपंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती स्वाती मधुकर चौधरी यांना नववी ते दहावी या गटात समाजशास्त्र विषयात जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिकाचे स्वरूप प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह नऊ हजार रुपये प्राप्त झाले.
