चोपडा येथे स्वामी विवेकानंद पुतळ्याचे अनावरण

 चोपडा येथे स्वामी विवेकानंद पुतळ्याचे अनावरण 

चोपडा,दि.२(प्रतिनिधी)येथील स्वामी विवेकानंद नगर क्रमांक २ येथे गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर स्वामी विवेकानंद यांचा अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. 

    ३० रोजी सकाळी ९ वाजता अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्गालगत असलेल्या स्वामी विवेकानंद नगर क्रमांक २ येथे स्वामी विवेकानंद यांचा अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण डॉ. विकास हरताळकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजय पोतदार, ॲड. रवींद्र जैन, गोवर्धनदास पोतदार हे होते. सदर पुतळा चोपडा येथील बांधकाम व्यावसायिक के.ए. कन्स्ट्रक्शनचे संचालक इंजिनियर अनिस बोहरी साहेब यांनी स्वखर्चाने चबुतरा व त्यावर स्वामी विवेकानंद यांचा अर्धाकृती पुतळा बसवून दिला आहे. 

   विवेकानंद नगरातील खुल्या भूखंडाच्या विकासकाने सुंदर बगीचा बनवलेला आहे. त्यात वॉकिंग ट्रॅक, बसण्यासाठी बेंच, मऊ गवताचे लॉन, रात्री सर्वत्र एल.ई. डी. लाईटच्या दुधाळ प्रकाश अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच स्वामी विवेकानंद नगर क्रमांक-२ हे सर्व सुविधायुक्त तांत्रिकदृष्ट्या अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन, नगर पालिकेचे पिण्याच्या पाणीचे कनेक्शन तसेच वापराच्या पाण्यासाठी दोन कूपनलिका, पथदिवे, ट्रीमिक्स काँक्रीट रस्ते असा सर्व सुविधायुक्त ले आऊट तयार करण्यात आलेला आहे.

   सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस.के.महाजन सर, अश्विन भावसार, मोहसीन पठाण, शरीफ मिस्तरी, शब्बीर मिस्तरी, जीवन लोहार, सुधाकर चौधरी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने