चोपडयाच्या श्री. एकविरा माता मंदिर मोठा भोईवाडा येथे श्री.कालभैरव मंदीर च्या वर्धापन दिनानिमित्त ह.भ.प.श्री.रवीकीरण महाराज यांचा 4 एप्रिल रोजी भव्य कीर्तनाचा कार्यक्रम
चोपडा दि.२(प्रतिनिधी) : सत्यभामा प्रतिष्ठान मुंबई व श्री एकविरा माता मंदिर भोईवाडा चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने काळभैरव मंदिर प्रथम वर्धापन दिनानिमित्त खानदेश रत्न व अहिराणी विनोदी कीर्तनाचे सम्राट श्री ह भ प रविकिरण महाराज दोंडाईचे कर यांचा भव्य कीर्तनाचा कार्यक्रम दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी साडेसात वाजता श्री गोली मंदिर परिसर ते चावडी रस्ता येथे आयोजित करण्यात आला आहे दुसऱ्या दिवशी 5 एप्रिल 2025 रोजी सात ते साडेनऊ वाजता महाप्रसादाच्या ही आयोजन करण्यात आले आहे
तरी या कार्यक्रमास श्रीराम भजनी मंडळ लासुर यांचे सहकार्य लाभणार आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री मोठा भोईवाडा मित्र मंडळ मित्र मंडळ बडगुजर गल्ली मित्र मंडळ व नागेश्वर बाबा गोल मंदिर परिसर समिती मित्र मंडळ मेहनत घेत आहे .तरी कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजक सत्यभामा प्रतिष्ठान मुंबई व राजेंद्र यशवंतराव बडगुजर यांनी केली आहे.