अकुलखेडा व चोपडा मल्हारपुरा विविध कार्यकारी सेवा सोसायटी १०० टक्के कर्ज वसुली


 अकुलखेडा व चोपडा मल्हारपुरा विविध कार्यकारी सेवा सोसायटी १०० टक्के कर्ज वसुली 

 चोपडा,दि.२(प्रतिनिधी) येथील मल्हारपुरा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित तालुका चोपडा जिल्हा जळगांव या संस्थेने बँक पिक कर्ज रु.दोन कोटी पंचवीस लाख एवढ्या रकमेची फेड दि.29.03.2025 रोजी 100% केली.संस्थेचे सचिव श्री.दत्तात्रेय रंगराव सपकाळे यांच्या वडीलांचे वृध्दपकाळाने निधन झाले असल्यावरही शेतकरी सभासद बंधु 0% व्याज सवलत योजनेपासून वंचित राहू नये.तसेच बँक पिक कर्ज फेड  मार्च 2025 पर्यंत होणे महत्त्वाचे असल्याने कर्ज वसुली हा संस्थेचा आत्मा आहे हे ब्रिद लक्षात घेऊन झालेले दुःख सोबत घेऊन संस्था पातळीवर कामकाज करून चोपडा मल्हारपुरा वि.का.सह.संस्थे.सोबतच जादा पदभारातील संस्था अकुलखेडे वि.का.संस्थेने सुद्धा दि. 29.03.2025 रोजी बँक पिक कर्ज फेड 100% केली.

या बद्दल श्री.घनश्यामजी अग्रवाल संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक जळगांव तसेच श्रीमती शैलजाताई निकम संचालीका जिल्हा मध्यवर्ती बँक जळगांव, रोहीत दादा निकम संचालक जिल्हा दुध संघ जळगांव व श्री.जितेंद्रजी देशमुख एम.डी.जिल्हा मध्यवर्ती बँक जळगांव यांनी संस्थेच्या चेअरमन सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांचे अभिनंदन केले.व संस्थेचे सचिव श्री.दत्तत्रेय सपकाळे यांचे कामकाजा बद्दल कौतुक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने