जागतिक महिला दिनानिमित्त चोपड्यात कार्यक्रम

 जागतिक महिला दिनानिमित्त चोपड्यात कार्यक्रम

चोपडा दि.६(प्रतिनिधी)- येथील जेष्ठ नागरिक संघात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दि.८ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे.

जेष्ठ नागरिक संघ सभागृहात होणा-या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी छायाबेन गुजराथी राहतील.तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.मोहिनी उपासनी,न.पा.च्या आरोग्य निरिक्षक दिपिका साळुंखे,ॲड.किशोरी नेवे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी विशेष करुन महिलांनी उपस्थिती देण्याचे आवाहन महिला जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा शकुंतला गुजराथी,फेस्कॅामच्या महिलाध्यक्षा ताराबाई पाटील,जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयदेव देशमुख,सचिव विलास पाटील व पदाधिका-यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने