चोपडा तालुक्यात रोटरी क्लब आणि समाजकार्य महाविद्यालय मार्फत पर्यावरण संरक्षण व संवर्धन जनजागृती अभियानावर व्याख्यानमालेचे आयोजन संपन्न
चोपडा दि.६(प्रतिनिधी)कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग मार्फत भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय चोपडा, विद्यार्थी विकास विभाग चोपडा आणि रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संरक्षण व संवर्धन जनजागृती अभियानांतर्गत वैजापुर गावात पर्यावरण संवर्धनाची गांभीर्य लक्षात घेऊन वैजापूर वनपरिक्षेत्रात पर्यावरण संरक्षण व संवर्धन जनजागृती अभियानांतर्गत पर्यावरण या समस्यांवर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती या व्याख्यानमालाची सुरुवात निसर्ग पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
याप्रसंगी वैजापूर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री दत्ता पावरा, श्री विकेश ठाकरे वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर, आय.एस. तडवी वनपाल- वैजापूर, प्रमुख अतिथी म्हणून, तर रोटे.निखिल सोनवणे प्रकल्प प्रमुख आणि रोटे. शिरीष पालीवाल सहाय्यक प्रकल्प प्रमुख म्हणून उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष डॉ. ईश्वर सौंदाणकर हे उपस्थित होते.
सदर व्याख्यानमालेत सुरुवातीला श्री विकेश ठाकरे वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर यांनी पर्यावरण संवर्धन, श्री. के.वाय.शेख वनपाल, खाऱ्यापाडाव जल व मृद संधारण, श्री. बी. आर. बारेला वनरक्षक, मलापुर उत्तर- वणवा प्रतिबंधक उपाययोजना, श्री. विजय जी.शिरसाठ वनरक्षक वैजापूर- वन्यजीव संरक्षण, संवर्धन आणि मानव वन्यजीव संघर्ष उपायोजना श्री.चुनीलाल आर.कोळी वनरक्षक खाऱ्यापाडाव- सर्प ओळख, सर्पदंश प्रथमोपचार व उपयोजना या विषयावर गावातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . तसेच वैजापूर ग्रामपंचायत सरपंच दत्ता पावरा यांनी समाजकार्य महाविद्यालयाचे या उपक्रमाच्या कौतुक करताना म्हणाले खरोखरच हा सामाजिक उपक्रम असून महाविद्यालयाच्या या उपक्रमामुळे पन्नास टक्के वणवा पेटवण्याचे नियंत्रण बऱ्यापैकी झालेले असून भविष्यामध्ये आपल्याला सातपुडा पर्वतरांगांमध्ये शंभर टक्के वणवा लागू नये पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून सहभागी होण्याचे आवाहन केले . तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर यांनी पर्यावरण संवर्धन व संरक्षण करण्याची समाजाची जबाबदारी असून यापुढे सातपुडा पर्वतरांगांमध्ये होणारे जैवविविधतेचे -हास व वणवामुळे जंगल नष्ट होत आहेत. हे समाजासाठी घातक असून यासाठी वनविभाग, समाज, समाजातील सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी वैजापूर वन विभागाचे कर्मचारी इंदुबारायला वंदना बारेला नेहा बारेला समीर तडवी जुबेर तडवी हर्षल पावरा तसेच रोटरी क्लब ऑफ चोपडाचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच समाजकार्य महाविद्यालयाचे टी. वाय. बी. एस. डब्ल्यू. व एस. वाय. बी.एस. डब्ल्यू. या वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते .
*समाजकार्य महाविद्यालय चोपडा विद्यार्थी विकास विभाग व रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेल्या पोस्टरचे अनावरण* वैजापूर गावात परिक्षेत्र अधिकारी श्री विकेश ठाकरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौदाणकर, प्रा.नारसिंग वळवी, डॉ. विनोद रायपुरे. आय.एस.तडवी,बाजीराव बारेला विजय,शिरसाठ दत्ता पावरा, के।वाय. शेख,चुनीलाल कोळीया मान्यवरांच्या हस्ते पोस्टराचे अनावरण केले .
वैजापूर वन क्षेत्र परिसरात मोठ्या प्रमाणात जंगलतोडीमुळे पर्यावरणाच्या होणारा ऱ्हास, वन्यजीवांची हानी, वनस्पतीचे नुकसान,वणव्यामुळे होणारे नुकसान, पर्यावरण संतुलनवर परिणाम, मानवी जीवनावर परिणाम, जैवविविधतेवर परिणाम तसेच सातपुडा पर्वत रांगांमध्ये वणवे पेटवण्याचे कारणे समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाने जाणून घेतले त्यामध्ये प्रामुख्याने सर्वेक्षणाच्याद्वारे निष्कर्ष करण्यात आले ते खालील प्रमाणे 1) नवाड अतिक्रमण धारकांकडून जंगलातील जागा मोकळी करण्यासाठी आग लावणे,2) डिंक काढण्याचे कामादरम्यान वनजिव जवळ येऊ नये म्हणून आग लावणे.,3) मानवी हस्तक्षेप वाढवून जंगलामध्ये पार्ट्या करणे, सिगारेट ओढणे यातून आग लागणे,4) जंगलातून सागवानाची तस्करी करण्यासाठी,5) मोहोच्या/ आंब्याच्या/ चारोळ्याच्या झाडाखाली पालापाचोळा जाळताना व इतर वनोत्पादीत वस्तू संकलित करताना प्रामुख्याने वणवा लागण्याचे कारणे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने वणवा विझवणे ही सामाजिक जबाबदारी आहेत।याचे भान व पर्यावरण संवर्धनचे गांभीर्य लक्षात घेऊन वचवा लागू नये म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजेत यासंबंधीची प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वैजापूर, शेणपाणी,मुळ्याउतार या गावातील 1)आदिवासी शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा बांध जळताना प्रथम आपल्या नजीकच्या वनाधिकाऱ्याला सांगावे,2)मोहच्या /आंब्याच्या/ चारोळ्याच्या झाडाखाली पालापाचोळा जळताना स्वतः शेतकऱ्यांनी वणवा पेटणार नाहीत याची काळजी घ्यावी 3)वनात फिरायला जाताना अग्निजन्य वस्तू घेऊ जाऊ नये,4) जंगलात किंवा जंगलातून जाणाऱ्या रस्त्याने सिगारेट, विळी ओढु नयेत. 5)कोणत्याही कारणाने आग लावण्याचा प्रयत्न करू नयेत,6)डिंक काढताना धावड्याचे, खैराचे झाड जाडू नये यासंबंधीचे उपायोजना व वनाचे फायदे कोणते आहेत.यासंबंधीचे खालील उपाय योजना पटवून देण्यात आल्या. त्यामध्ये जंगलात गवत किंवा झाडांची मुळे पाणी धरून ठेवतात त्यामुळे बोरवेल विहीर यांना पाणी वाढते, गवतामुळे डोंगराची माती वाहून जात नाही त्यामुळे उन्हाची तीव्रता ही कमी होण्यास मदत मिळते, पशुपक्षी यांना निवारा मिळाल्याने निसर्गचक्र सुधारते, रानात पाणी उपलब्ध झाल्याने सध्या चालू असलेल्या मानव वन्यप्राणी संघर्ष यासारख्या समस्यांना प्रतिबंध होईल या संबंधीचे माहिती ग्रामस्थांना पटवून देण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख प्रा. नारसिंग वळवी यांनी केले.सूत्रसंचालन व आभार डॉ विनोद रायपुरे यांनी केले.