ज्येष्ठ नागरीक संघ चोपडा येथे चोपडा नगर परीषदे मार्फत वाचन कट्टा कार्यान्वीत

 ज्येष्ठ नागरीक संघ चोपडा येथे चोपडा नगर परीषदे मार्फत वाचन कट्टा कार्यान्वीत


चोपडा दि.५(प्रतिनिधी)आज दि.5मार्च 2025 बुधवार रोजी चोपडा नगर परीषदेचे माध्यमातून  ज्येष्ठ नागरीक संघ,चोपडाच्या प्रांगणात चोपडा नगर परीषद संचलीत वाचन कट्टाचे उदघाटन न.प.चोपडा चे मुख्याधिकारी श्री राहुल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.व्यासपीठावर न.प.चोपडाचे  मुख्याधिकारी,उपमुख्याधिकारी संजय मिसर,दिपाली साळुंखे(आरोग्य निरीक्षक),ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष जयदेव देशमुख,कोषाध्यक्ष दिलीपराव पाटील , सरसचिव अभियंता विलास एस पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतीमा पुजनाने झाली. एन.डी.महाजन सरांनी ईशस्तवन केले.विनय पाठक यांनी बासरी वादनाने स्वागत गीत गायले.

संघाचे अध्यक्ष जयदेव देशमुख यांनी आपल्या भाषणात ज्येष्ठ नागरीक संघ आवारात मिनी सार्वजनिक शौचालय बांधुन देण्याची मागणी केली.यापुढेही ज्येष्ठ नागरीक संघाला पाहीजे ती यथोचित मदत नगर पालीका करेल असे अश्वासन मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी आपल्या भाषणात दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य अधिकारी दिपाली साळुंखे यांनी केले.सुत्रसंचालन इंजि.विलास एस.पाटील यांनी,तर आभार प्रदर्शन फेस्काॅमचे तालुका सचिव शांताराम पाटील यांनी केले.कार्यक्रमासाठी गोकुळ पाटील, एम डब्ल्यू पाटील, श्यामभाई गुजराथी, यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने