श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील बी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची रुग्णालयास भेट

 श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील बी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची रुग्णालयास भेट

चोपडा दि.६(प्रतिनिधी)महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी चोपडा येथील प्रथम वर्ष वर्गातील विद्यार्थ्यांनी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली.

रुग्णालयात कशा पद्धतीने काम केले जाते याबाबत माहिती जाणून घेतली.पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना रुग्णालयातील कामकाजाविषयी ज्ञान मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. बी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी हे रोजगाराच्या दृष्टीने ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, खाजगी रुग्णालयात औषधनिर्माण अधिकारी (फार्मासिस्ट) म्हणून कार्यरत होतात. त्यावेळी त्यांना अडचणी यायला नको व काम कसे करावे तसेच विभागनिहाय कामाचे स्वरूप कसे असते आदी विषयांना लक्षात घेऊन चोपडा येथील उपजिल्हा रूग्णालयात भेट दिली.नर्सिंग होम हेड यांनी रुग्णालयातील विविध विभागांची तसेच तेथील उपकरणांची, सिटीस्कॅन सेंटर, फार्मसी विभाग व आधुनिक आरोग्य सेवा प्रणाली, साहित्य यांची ओळख करून दिली या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय भैयासाहेब  अँड.संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव माननीय  डॉ. स्मिता संदीप पाटील, उपाध्यक्षा श्रीमती आशाताई पाटील व प्राचार्य डॉ. गौतम पी.  वडनेरे व प्रबंधक श्री.प्रफुल्ल मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रथम वर्ष वर्गाचे समन्वयक डॉ. भरत जैन व प्रा. डॉ. सुवर्णलता महाजन , प्रा.योगेश चौधरी , प्रा.रवींद्र श्रावणे प्रा. आकिफ बागवान, प्रा. आकांक्षा पाटील , प्रा.अश्विनी पाटील प्रा. नलिनी वाघ इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर सहकारी प्रवीण सोनवणे हे सहभागी झाले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने