जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सोसायटीत सौ सोनल पवार व सौ श्वेतांबरी निकम यांची बिनविरोध निवड
जळगाव दि.८(प्रतिनिधी): जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी सोसायटी तथा जिल्हा मार्केटिंग या संस्थेच्या निवडणुक 2025 ते 2030 या कालावधीसाठी जळगाव जिल्हा बँकेच्या माजी संचालिका जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक च्या माजी संचालिका सौ सोनल संजय पवार तसेच सौ श्वेतांबरी रोहित निकम यांची बिनविरोध निवड झाली आहे
सदर संस्था माजी आमदार बॅरिस्टर देवराव निकम यांनी स्थापन केलेली होती तसेच या संस्थेत अनेक वर्ष स्वर्गीय भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेचे कामकाज सुरू होतं मध्यंतरी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालिका सौ शैलजादेवी दिलीपराव निकम या विद्यमान अध्यक्ष म्हणून कामकाज बघत होत्या आणि आज पुन्हा त्यांच्याच परिवारातील सुनेचे सहकार क्षेत्रात पदार्पण झालेल आहे या निमित्ताने सहकार क्षेत्रात पवार आणि निकम परिवार यांनी आपला ठसा उमटवण्याचे सिद्ध झाले आहे सौ सोनल पवार व सौ श्वेतांबरी निकम यांचे जिल्हा कृषी औद्योगिक सोसायटीच्या व सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे