गोविंद हरे गोपाल हरे..च्या नाम गजरात श्रीकृष्ण जन्मोत्सवाची कथेत भाविक मंत्रमुग्ध.. नंदुरबारकर वेदमूर्ती अविनाश जोशी यांनी केले भागवत पारायणाचे महत्त्व विशद

 गोविंद हरे गोपाल हरे..च्या नाम गजरात श्रीकृष्ण जन्मोत्सवाची कथेत भाविक मंत्रमुग्ध.. नंदुरबारकर वेदमूर्ती अविनाश जोशी यांनी केले भागवत पारायणाचे महत्त्व विशद 

चोपडा दि.८(प्रतिनिधी) : संत साहित्य मानवासाठी प्रेरक असून विविध धर्मग्रंथांनी मानवाला आत्मकल्याणाचा मार्ग दाखविला आहे. या मार्गावर चालून सर्वांनी आपले जीवन सत्कर्मी लावावे. भागवत कथा म्हणजे दुःख समूळ नष्ट करणारे अमृत आहे असे प्रतिपादन  वेदमूर्ती श्री अविनाशजी जोशी नंदुरबार यांनी यावेळी केले अपूर्ण मारोती मंदिर पूर्णत्वासाठी दानशूर दात्यांनी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले.

घर बांधणे जेवढे सोपे असते तेवढे सोपे मात्र मंदिर बांधणे नाही हे स्पष्ट  करत त्यासाठी पूर्व पुण्याईचे गाठोडे ज्याच्याजवळ असते तशाच व्यक्तीच्या हातून मंदिर बांधण्याच्या योग चालून येतो तो संजू भाऊ चौधरी यांच्या रुपाने चालून आल्याने एवढे मोठे मंदिर आपल्या डोळ्यासमोर दिसत असल्याचे त्यांनी म्हटले.भगवंत श्रीकृष्णाच्या जन्मवेळी सुद्धा त्यांच्या आई-वडिलांना खूप वेदना सोसाव्या लागल्या तर आपण तर मानव आहोत आपणासही दुःखाला सामोरे जावे लागणारच हे दुःख संपावयाचे असल्यास भागवत कथा ऐकण्याचे तयारी ठेवा विशेष करून नव्या पिढीला परमार्थ ऐकण्याची अत्यंत गरज असल्याचे सांगून श्री कृष्ण जन्मोत्सवाची कथा  विविध मार्मिक दाखले देऊन विषद केली.यावेळी काल्पनिक वसुदेव टोपलीत क्रीष्णा बाळाला घेऊन मंडपात आल्याचा संजीव देखावा सादर करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर वेदमूर्ती अविनाश जोशी महाराजांच्या हस्ते पत्रकार महेश पांडुरंग शिरसाठ व जेडीसीसी बॅंक शाखाधिकारी सतिष पाटील  यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

  श्रीमदभागवत हे संसारातील भय दुःखाचा समूळ नाश करणारे अमृत आहे. मन शुद्ध करणारे याच्यापेक्षा चांगले साधन नाही. भगवंत प्राप्तीसाठी परमात्मा संबंधातील श्रवण, मनन, चिंतन हेच प्रत्येक जीवासाठी कल्याणकारी असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

 भागवत कथेप्रसंगी भजन संगीत कलाकारांनी सुमधुर  संगिताची साथ देऊन भाविकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी संजय छगन चौधरी यांनी अपूर्ण मारोती मंदिर बांधकाम परिसरातील नागरिकांनी साथ दिल्यास पूर्ण करू असे आश्वासन दिले.कथेप्रसंगी  मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

आज दिनांक ८ रोजी रात्री आठ ते 11 ह भ प सुशील जी महाराज विटनेरकर यांचा सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम होत आहे तर ९ मार्च 2025 रोजी सकाळी ९ते १२वाजेच्या दरम्यान श्रीमद् भागवत कथा  समाप्त होणार आहे त्याच दिवशी महाप्रसाद भंडाराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे . या परमार्थिक कार्यक्रमाचा लाभ जनतेने  मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलेले  आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने