चोपडा नगरपालिकेत जागतिक महिलादिनी महिलांसाठी खास हिरकणी कक्षाची निर्मिती.. ♦️महिलांच्या कर्तूत्वाचा सन्मान व्हायला हवाच..! मुख्याधिकारी राहुल पाटील यांचे प्रतिपादन

 

चोपडा नगरपालिकेत जागतिक महिलादिनी महिलांसाठी खास हिरकणी कक्षाची निर्मिती..
♦️महिलांच्या कर्तूत्वाचा सन्मान व्हायला हवाच..! मुख्याधिकारी राहुल पाटील यांचे प्रतिपादन 

चोपडा दि.८(प्रतिनिधी)आज जागतिक महिला दिवसाचे  औचित्य साधून चोपडा नगर परिषदेने  मुख्याधिकारी श्री राहुल पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी खास अनोखा " हिरकणी कक्ष" स्थापन करून महिलांबद्दल एक सन्मान प्रस्थापित केला आहे. त्यामुळे  चोपडा नगर परिषदेत महिलांना बसण्यासाठी व आपल्या बाळास स्तनपान करण्यासाठी हा कक्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कक्ष उद्घाटनाप्रसंगी मुख्य अधिकारी श्री राहुल पाटील  यांनी महिलां मातांना उद्देशून सांगितले की, महिला दिन साजरा करणे म्हणजे केवळ शुभेच्छा देणे नव्हे तर स्त्रियांचा आदर  कर्तृत्वाबद्दल सन्मान करण्याचा दिवस आहे  महिलांनी  केवळ आपल्या कुटुंबापर्यंत मर्यादित न राहता त्यांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय व प्रशासकीय अशा सर्व क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेण्यासाठी पुढे असले पाहिजे. असे  सांगितले.यानंतर महिलांना बेबी किटही त्यांनी वाटप केले. 

कार्यक्रमात महिलांचा सन्मान किंवा जागर व्हावा याकरिता कर अधिकारी संदीप गायकवाड  यांनी एक महिलांच्या सन्मानार्थ  कविता सादर केली. तसेच स्वच्छता निरीक्षक दिपाली साळुंखे यांनी महिलांना संबोधित करताना सांगितले की, महिलांनी संघर्ष करावा.. मोठ मोठी स्वप्न पाहवीत आणि ती पूर्ण व सत्यात उतरण्यासाठी  अतोनात प्रयत्न करून समाजामध्ये एक प्रतिष्ठा निर्माण करावी.
या हिरकणी कक्षामध्ये महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे त्यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी तसेच म्युझिक पाळणा बसवण्यात आलेला आहे. या कक्षात  हवा खेळती रहावी याकरिता व्हेंटिलेशन त्याचप्रमाणे पंख्यांची ,कुलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच  सुंदर अशी कार्टून काढून
रंग पेंटिंग करण्यात आलेली आहे तसेच  कक्षा बाहेरील वातावरण  उल्हासदायक असावं याकरिता परिसर देखणीय करण्यात आला आहे.दरम्यान काही तक्रारी उद्भवल्यास त्या तक्रारींकरिता संपर्क क्रमांक व अधिकाऱ्यांची नावे असलेला बॅनर ठेवण्यात आलेला आहे त्यासोबत महिलांना लहान बाळांसाठी लसीकरणाचा वेळापत्रक ज्ञात व्हावं म्हणून लसीकरण तक्त्याचे  बॅनर देखील लावण्यात आलेले आहे.  या कक्षाचा फायदा नगर परिषदेत येणाऱ्या महिला  किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांना मोठ्या प्रमाणावर होणारआहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखापरीक्षक मुकेश परदेशी व गणेश पाठक यांनी  केले यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने