सर्व महिला आणि मुलींसाठी: हक्क, समानता,सक्षमीकरण”करणे काळाची गरज :डॉ नंदिनी

 “सर्व महिला आणि मुलींसाठी: हक्क, समानता,सक्षमीकरण”करणे काळाची गरज :डॉ नंदिनी वाघ


 चोपडा दि.८(प्रतिनिधी)पंकज कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय ,चोपडा येथे महिला तक्रार निवारण समिती व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात बहिणाबाई घ्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्रा. डॉ. महादेव वाघमोडे तर प्रमुख मार्गदर्शक प्रा.   डॉ. नंदिनी वाघ ह्या  होत्या. 

या कार्यक्रमाच्या प्रसंगी मार्गदर्शक करित असताना प्रा.डाॅ. नंदिनी वाघ यांनी महिलांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी, लिंग समानतेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम महिलांच्या हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि समाज, अर्थव्यवस्था, संस्कृती आणि राजकारणात त्यांचे योगदान प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो.महिलांना भेडसावणाऱ्या असमानतेकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांना समान हक्क आणि संधी मिळतील अशा भविष्याला चालना देण्यासाठी हा दिवस एक महत्त्वाचा प्रसंग आहे.

 "स्त्री ही भविष्य आहे" आणि ते साध्य होईपर्यंत, महिलांना समान बुद्धिमत्ता तुम्ही समाजात प्रगतीची क्षमता असल्याचे मानत असाल, तर महिलांना सक्षम करणे आणि लैंगिक समानतेला राजकीय, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांसह जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनापेक्षा चांगला दिवस नाही. इतिहासात स्त्रियांचे समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे आणि भविष्यात अजूनही मोठे योगदान देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे, आपण सर्वजण या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा वापर करून सर्व जणांसाठी चांगले भविष्य घडवण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण करू शकतो, त्यांना नेतृत्वाची भूमिका घेण्यासाठी आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा आवाज ऐकवण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो. दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन (international women's day) साजरा केला जातो.

      या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करीत असताना  प्रा. डॉ. महादेव वाघमोडे यांनी महिलांमध्ये आकाशाला गवसणी घालण्याची क्षमता असल्याचे सांगितले. ध्येय सहनशीलता व पराक्रमाची पराकाष्टा करण्याची क्षमता महिलांमध्ये असते.तसेच आधुनिक काळातील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियांनी केलेले बदल त्यात पी टी उषा सानिया नेहवाल ,राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती ,जयललिता ,स्वर्गीय लतामंगेशकर इत्यादी यशस्वी महिलांच्या दाखले देऊन स्त्री वर्णन केले. प्रा. डॉ महादेव वाघमोडे यांनी केले.

या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. डॉ. दिपक देवरे यांनी केले, तर प्रा. डॉ. अरुण मोरे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. आर. आर. अत्तरदे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने