लोक उदय फाउंडेशन तर्फे ९ रोजी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गौरव सोहळा.. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व सेवा निवृत्त पोलीस उपायुक्त मंगलसिंग सूर्यवंशी यांची खास उपस्थिती

 

 लोक उदय फाउंडेशन तर्फे ९ रोजी  अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गौरव सोहळा..  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व सेवा निवृत्त पोलीस उपायुक्त मंगलसिंग सूर्यवंशी यांची खास उपस्थिती 



चोपडा,दि.८(प्रतिनिधी)-लोक उदय फाउंडेशनच्या वतीने प्रशासकीय सेवेत तसेच शासनाच्या सेवेत उत्कृष्ट काम अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा.९ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजता  हॉटेल वृंदावन,देशमुख संकुल,चोपडा येथे आयोजित करण्यात आलाआहे. यात विशेष म्हणजे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व सेवा निवृत्त पोलीस उपायुक्त मंगलसिंग सूर्यवंशी यांच्याहस्ते हा सोहळा पार पडणार आहे.

फाऊंडेशनने प्रशासकीय सेवेत तसेच शासनाच्या सेवेत काम करीत असतांना प्रामाणिकपणा,सचोटी व समाजाविषयीच्या प्रेमामुळे उत्तम काम करणाऱ्या हातांचा गौरव व्हावा, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळावी आणि समाजासमोर चांगल काम करणारी माणसं यावीत यासाठी तालुक्यातील शासकीय व प्रशासकीय सेवेतील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वृंदाचा यथोचित सन्मान व सत्कार व्हावा जेणेकरून त्यांच्यासह इतरांना देखील प्रेरणा मिळावी या उदात्त भावनेतून हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

तरी सदर कार्यक्रमास उपस्थिती द्यावी असे आवाहन लोक उदय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीलआबा पाटील(वाळकीकर)यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने