अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्त महिला आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांचा सन्मान
चोपडा दि.८(प्रतिनिधी) ;प्राथमिक आरोग्य केंद्र-अडावद ता-चोपडा येथेआज दिनांक-०८ मार्च २०२५ शनिवार रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अडावद येथील महिला आरोग्य कर्मचारी वर्ग तथा आशा स्वयंसेविकांना जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी-डॉ.रमेश धापते यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन सुशीर, आरोग्य सहाय्यक-वाय आर पाटील, राहुल नेहरकर, आरोग्य सहयिका-शोभा चौधरी, आरोग्य सेवक-विजय देशमुख, आर एस पाटील, कैलास बडगुजर, संतोष भांडवलकर, धुडकू वारडे, सचिन माळी, स्वप्नील बारेला, आरोग्य सेविका-सुनीता दुधे, आशा धनगर, निवेदिता शुक्ल, कविता पाडवी, बबिता वडवी, औषध निर्माण अधिकारी-विजया गावीत, आशा सेविका-मुक्ता महाजन, निशा महाजन, विजूबाई ढिवरे, आदी सर्व उपस्थित होते.