चोपड्याच्या प्रा.डॅा.मोहिनी उपासनी महिला प्रमुख पदावर
चोपडा दि.२४(प्रतिनिधी)- येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या अध्यापक प्रा.डॅा.मोहिनी उपासनी यांची अखिल भारतीय इतिहास संकलन योजना नविदिल्ली संलग्नीत इतिहास संकलन संस्था महाराष्ट्रच्या देवगिरी प्रांताच्या सह महिला प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.इतिहास संकलनात महिला सहभाग व संघटनात्मक जवाबदारी त्यांना देण्यात आली आहे.
करमाड(बिड) येथील राजीव गांधी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अखिल भारतीय इतिहास संकलन योजना नविदिल्ली व इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र यांनी आयोजित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळा व देवगिरी प्रांत सर्वसाधारण सभेत प्रा.डॅा.उपासनी यांची नियुक्तीची घोषणा व सत्कार करण्यात आला.यावेळी या संस्थांशी निगडीत पदाधिकारी,मार्गदर्शक व कार्यकर्ते उपस्थित होते.