वर्डी गावी सद्गुरू सुकनाथ बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त १४ रोजी महाप्रसाद भंडारा व देवदर्शन
चोपडा,दि.13(प्रतिनिधी) तालुक्यातील वर्डी येथे सालाबादाप्रमाणे ह्या वर्षी ही श्री समर्थ सद्गुरु सुकनाथ बाबा यांची ९० वी पुण्यतिथीनिमित्त दिनांकः १४/३/२०२५ शुक्रवार रोजी भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
कार्यक्रमाची रुपरेषा अशी,सकाळी ७ वा. आरती,
सकाळी : ८ वा मारुती अभिषेक सकाळी ९ वा. समाधी अभिषेक,सकाळी १० समाधी स्नान,सकाळी ११ वा होम हवन,दुपारी १२ वा. आरती ,दुपारी १ ते रात्री ७ पर्यत महाप्रसाद भोजन,सायंकाळी ७ वा. आरती,रात्री ८ वाजेपासून पालखी मिरणूक,रात्री ९ वा. भजन, किर्तन व भारुडाचा कार्यक्रम.
तरी समस्त भावीक भक्तांनी बाबांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन पोलीस पाटील पद्माकर नाथ , श्री. दिनानाथ महाराज (भैय्यादादा) मठाधिपती व समस्त गावकऱ्यांनी केले आहे.