विवेकानंद विद्यालयात आनंद मेळावा उत्साहात साजरा
चोपडा दि.१०(प्रतिनिधी ) येथील विवेकानंद विद्यालयात बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला इयत्ता पाचवी ते नववीच्या एकूण दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत विविध खाद्यपदार्थ व मनोरंजक खेळांचे स्टॉल मांडत आनंद मेळाव्याचा आनंद घेतला खाद्यपदार्थांची निवड कशी करावी ते कसे बनवावे त्याचा स्टॉल कसा मांडावा त्या कशा विक्री कराव्या व व्यवहार कसा करावा याचं व्यावहारिक ज्ञान यातून विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाले. आनंद मेळाव्याचे उद्घाटन डॉ.नीता हरताळकर व ज्योत्स्ना हरताळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर ,उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल, सचिव अॅड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, विश्वस्त व मुख्याध्यापक नरेंद्र भावे ,आशा चित्ते, पवन लाठी, संजय सोनवणे व बहुसंख्येने पालकवर्ग उपस्थित होते.या बाल आनंद मेळाव्याची प्रेरणा मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांनी तर सर्व नियोजन विद्यालयातील शिक्षक पवन लाठी, सरला शिंदे, नूतन अत्तरदे, राकेश विसपुते, हेमराज पाटील, विजय पाटील ,कुणाल पाटील, संजय खैरनार यांनी केले तसेच सर्व वर्गशिक्षकांच्या सहकार्याने आनंद मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला.