कोळी समाजाच्या आयोजित सामूहिक संस्कार सोहळ्यात समाज बांधवांनो एकत्र या..! प्रभाकर आप्पा सोनवणे
यावल,दि.१०(प्रतिनिधी) जळगाव येथे ४ मे रोजी कोळी समाज बहुउद्देशीय मित्र मंडळ जळगाव यांच्या वतीने सामूहिक विवाह संस्कार चे आयोजन करण्यात आले असून सर्व यावल रावेर तालुक्यातील समाज बांधवांनी एकत्रित यावे असे आवाहन फैजपूर येथे आयोजित कोळी समाज बैठकीमध्ये सभेचे अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी केलेले आहे
यावेळी यावल व रावेर तालुका कोळी समाजाच्या वतीने फैजपूर येथील पवन दास जी महाराज यांना नुकत्याच झालेल्या प्रयागराज येथे महा कुंभमेळ्यात महामंडळेश्वर पदवी प्रधान करण्यात आली आली असता समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळेस सभेचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी स्वीकारले तर प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा येथील जगन्नाथ बापू बाविस्कर गोकुळ सूर्यवंशी गंभीर उन्हाळे ऍड रमाकांत सोनवणे फैजपूर येथील कोळी समाजाचे अध्यक्ष दिलीप कोळी अनिल कोळी हे होते जळगाव आयोजित सामूहिक संस्कार सोहळा हा पूर्णपणे मोफत असून जास्तीत जास्त समाज बांधवांनी यात आपला सहभाग घ्यावा असे आयोजकांतर्फे करण्यात आले आभार व सूत्रसंचालन गुरव सर यांनी केले