राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ..अंगणवाडी,शाळा,आश्रम शाळा,जि.प.शाळा व वस्तीगृह विद्यार्थ्यांची होणार आरोग्य तपासणी .. चोपडा तालुक्यातील जाणून घ्या आपल्याकडील तपासणी तारीख

 राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ..अंगणवाडी,शाळा,आश्रम शाळा,जि.प.शाळा व वस्तीगृह विद्यार्थ्यांची होणार आरोग्य तपासणी .. चोपडा तालुक्यातील जाणून घ्या आपल्याकडील तपासणी तारीख 

चोपडा,दि.५(प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे कडील प्राप्त मार्गदर्शक सूचना नुसार  दिनांक 1 मार्च  रोजी माध्यमिक कन्या विद्यालयात उद्घाटन पार पडले. या मोहिमे अंतर्गत सर्व मुलांची आरोग्य तपासणी, किरकोळ आजारावर उपचार, विशेष आजाराच्या मुलांना संदर्भ सेवा दिल्या जाणार आहेत. यात जन्मजात व्यंग, कमतरता, आजार, व विकासात्मक विलंब शोधून त्यांना मोफत उपचार ,शस्त्रक्रिया करण्यात येतील. चोपडा तालुक्यातील माहे मार्च महिन्यात 1 मार्च 25 ते 31 मार्च 25 पर्यंत शाळा व अंगणवाडी तपासणी वेळापत्रक करण्यात आले आहे.

त्यानुसार 3 मार्च रोजी जि. प. शाळा पारगाव, पूनगाव, मामलदे, काजीपुरा व अंगणवाडी काजिपुरा. बॉईज हॉस्टेल चोपडा

4 मार्च रोजी अंगणवाडी देवझीरी, देवगड, देव्हारी, भार्डू जि. प. शाळा कर्जाणे

5 मार्च अंगणवाडी बोरमळी, आश्रम शाळा सनफुले , हातेड, जिप शाळा मेलाने

6 मार्च आश्रम शाळा धानोरा जिप शाळा जिरायतपाडा, अंगणवाडी वैजापूर, मेलाने.

7 मार्च अंगणवाडी, शाळा धुपमाय वस्ती, जिप शाळा उजाड कर्जणे, अंगणवाडी वैजापूर, मेलाणे.

8 मार्च मण्यावस्ती शाळा व अंगणवाडी

10 मार्च आश्रम शाळा देवझिरी, अंगणवाडी डेडीयापाडा, खाऱ्यापाडा, जिरायतपाडा.

11 मार्च आश्रम शाळा बोरअजंती, वैजापूर 

12 मार्च शेवरेपाडा अंगणवाडी व शाळा, कर्जाना अंगणवाडी , आश्रम शाळा वैजापूर.

13 मार्च शेवरे बु अंगणवाडी व शाळा, मराठे अंगणवाडी

15 मार्च प्रताप विद्या मंदिर, जिप शाळा मालापुर.

17 मार्च नॅशनल उर्दू हायस्कूल चोपडा ,  अंगणवाडी उजाड करजाने, आश्रम शाळा कर्जना, उमर्टी.

18 मार्च अडावद एन डी एम शाळा , मुळ्याउतार.

19 मार्च अंगणवाडी शेनपाणी, गोरगावले शाळा पूनर्तपासणी

20 मार्च अंग्लो उर्दू, हायस्कूल अडावद,  अंगणवाडी नारोद , खडगाव गोरगावले शाळा तपासणी

21 मार्च धानोरा शाळा पूनर्तपासणी, खरद अंगणवाडी , लेडीज हॉस्टेल चोपडा, कोळंबा शाळा पूनर्तपासणी.

22 मार्च झेड. टी. एम. शाळा पूनर्तपासणी,

24 मार्च आश्रम शाळा कृष्णापुर , कठोरा शाळा पूनर्तपासणी .

25 मार्च आश्रम शाळा सत्रासेन. नागलवाडी शाळा पूनर्तपासणी.

26 मार्च आश्रम शाळा सत्रासेन.

27 मार्च ते 31 मार्च 25 या कालावधीत संदर्भित लाभार्थी साठी उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे विशेष तपासणी  शिबिराचे आयोजन  करण्यात येणार आहे.

या तपासणी साठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत चोपडा तालुक्यासाठी कार्यरत असणाऱ्या चार तपासणी पथकांमधील वैद्यकीय अधिकारी औषध निर्माता आरोग्य सेविका यांचे मार्फत शाळा व अंगणवाडी केंद्र तसेच शासकीय वस्तीगृह या ठिकाणी आरोग्य तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. तरी पालकांनी आपल्या पाल्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन चोपडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर व उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने