मुख्य वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय चोपडा यांची श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयास सदिच्छा भेट

 मुख्य वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय चोपडा यांची श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयास सदिच्छा  भेट  

चोपडा दि.५(प्रतिनिधी)– श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयास डॉ. सुरेश  पाटील (मुख्य वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय चोपडा)  यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या आगमनाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना वैद्यकीय व फार्मसी क्षेत्रातील अद्ययावत माहिती मिळण्याची संधी प्राप्त झाली. यावेळी त्यांनी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना औषधनिर्माणशास्त्र व आरोग्य सेवा क्षेत्रातील नवीन संधींबद्दल मार्गदर्शन केले. तसेच, त्यांनी व्यावसायिक कौशल्ये, संशोधनाच्या संधी व आरोग्य क्षेत्रातील बदलत्या गरजांवर प्रकाश टाकला व आजच्या युगातील वाढते आजार आणि त्यांची कारणे यांवर सखोल माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांच्या मार्गदर्शनाने प्रेरणा घेतली. 

सदर भेट ही फार्माकॉलॉजि विभागाच्या विभागप्रमुख प्रा. सौ. नलिनी मोरे यांनी आयोजित केली होती  व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. अध्यक्ष भैय्यासाहेब अँड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदिप पाटील व उपाध्यक्षा श्रीमती आशाताई पाटील, प्राचार्य डॉ. गौतम पी वडनेरे, रजिस्टार श्री प्रफुल्ल बी मोरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे सहृदय आभार व कृतज्ञता व्यक्त केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने