उनपदेव येथे 'गुलाल्या बाजाराला' आदिवासी बांधवांनी उधळला गुलाल : भोंगऱ्याच्या तयारीला लागण्याचा दिला संदेश
अडावद ता. चोपडा (संजीव शिरसाठ ) : चोपडा तालुक्यातील उनपदेव शरभंग पाडा येथे आदिवासी बांधवांनी सालाबाद प्रमाणे भोंगऱ्या साजरा करण्यासाठी सात दिवस अगोदर गुलाल्या बाजारा निमित्त भोंगऱ्या देवाची पूजा करीत गुलाल उधळीत सर्व पाड्या वस्त्यात विखुरलेल्या आदिवासी बांधवांना येत्या सोमवारच्या बाजार भोंगऱ्या बाजार साजरा होईल याची सूचना यानिमित्ताने दिली.
३ रोजी सकाळी १० वाजता शरभंग पाडा येथे ज्या ठिकाणी येत्या सोमवारी भोंगऱ्या बाजार भरला जाणार आहे त्या मैदानावरील एका बाजूला पुजारा भाया हुलकाऱ्या याने भोंगऱ्या देवाची स्थापना करून गुलाल, अगरबत्ती, श्रीफळ वाढवून पूजा करण्यात आली व गुलाल उधळून सातपुड्यातील कानाकोपऱ्यातील पाड्या वस्तीत राहणाऱ्या आदिवासी बांधवांना भोंगऱ्या बाजार भरणार असल्याची सूचना दिली जाते येत्या सोमवारी भोंगऱ्या बाजार येथे भरणार आहे.
यावेळी पोलीस पाटील देवसिंग जामसिंग पावरा, संजीव पांडूरंग शिरसाठ आदिवासी समाज सेवक ,गाव डाया गजीराम पावरा 'शेवरे बुद्रुकचे पोलीस पाटील गणदास बारेला, ग्रामपंचायत माजी सदस्य जावेदखां पठाण, सचिन महाजन, रामकृष्ण महाजन, पत्रकार रफिक मण्यार, पि. आर. माळी, रायसिंग पावरा, मेंबर खुमसिंग बारेला, टुबासिंग पावरा, नरसिंग बारेला, जगन बारेला, भाकीराम बारेला, कनसिंग बारेला, रमेश बारेला, ताराचंद बारेला, कांतीलाल बारेला, लक्कडसिंग बारेला, सत्तरसिंग पावरा , अनिल बारेला, अनिल पावरा, रायसिंग बारेला, गण्या बारेला, पन्नालाल बारेला, पांड्या बारेला, हाससिंग पावरा, रामचंद बारेला, बाटा पावरा, दिलीप बारेला आदींसह आदिवासी बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते.