केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. सी.आर. पाटील यांना चोरवडचे प्रगतीशील शेतकरी छोटूभाई पाटील यांचे निवेदन

 

केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. सी.आर. पाटील यांना चोरवडचे प्रगतीशील शेतकरी  छोटूभाई पाटील यांचे निवेदन 


चोपडा दि.९(प्रतिनिधी)केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.  सी.आर. पाटील  यांना पारोळा तालुक्यातील चोरवड,भोडण, टिटवी,शिरसमनी, भडगाव  तालुक्यातील महिंदले, पलासखेडे  या गावांना गिरणा पाटबंधारे विभागाच्या गिरणापाटाद्वारे सब कॅनॉल तयार करून शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी  चोरवड येथील प्रगतीशील शेतकरी श्री छोटू भाई पाटील यांचे नेतृत्वाखाली आज निवेदन देण्यात आले.

 यावेळी  खासदार   स्मिताताई वाघ, आमदार राजु मामा भोळे, आमदार श्री अमोल जावळे, चोरवड येथील सरपंच श्री राकेश पाटील. माझी सरपंच श्री विजय पाटील., डॉ जे के  पाटील,  अँड विश्वासराव भोसले,. समाधान मगर टिटवी, राहुल देसले, बालू पाटील,किशोर पाटील, सुभाष पाटील देसले. किरण पाटील, दिनेश पाटील  हर्षल पाटील भागवत पाटील, राजेंद्र पाटील, भैया साहेब पाटील, सुभाष बालू पाटील,निंबा पाटील, विनोद पाटील, मेजर प्रविण पाटील  आदी  शेतकरी उपस्थित होते.                                

  मुख्य गिरणा  कॅनाल  मधून सुमारे चार  किलोमीटर  उप कॅनाल तयार करून टिटवी येथील पाच पांडव परिसरातील अंजनी नदीत, पाणी टाकल्यास. चोरवड,टिटवी, भोडण, शिरसमनी,महिंदले, पळासखेडे.ईत्यादी गावांना फायदा होईल व कायम स्वरूपी. पिण्याच्या पाण्याचा व शेती  सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने