महाजन इंग्लिश क्लासेसच्या विद्यार्थ्यांची" उनपदेव सहल" उत्साहात संपन्न

 

महाजन इंग्लिश क्लासेसच्या विद्यार्थ्यांची" उनपदेव सहल" उत्साहात संपन्न


चोपडादि.११(प्रतिनिधी) येथील महाजन इंग्लिश क्लासेस मार्फत श्रीक्षेत्र उनपदेव येथे उन्हाळी सहल मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.  विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळावी व निसर्गावर प्रेम वाढवे या उद्देशाने ही शैक्षणिक सहल काढण्यात आली.
प्रभू श्री रामचंदांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र उनपदेव हे एक पौराणिक स्थळ म्हणून प्रख्यात आहे . श्री रामचंद्र भगवान  यांनी मारलेल्या बाणाने  येथे गो मुखातून पाणी निघालेले आहे त्या पवित्र पाण्याने  बरेचसे आजार बरे होतात अशी आख्यायिका आहे.वैज्ञानिक दृष्टीकोनातून हे पाणी सल्फर युक्त असून त्वचेच्या आजारासाठी कसे उपयुक्त आहे हे क्लासेसचे संचालक  महाजन सरांनी मुलांच्या लक्षात आणून दिले. शरबंग ऋषींचे मंदिर, भगवान शंकराचे प्राचीन मंदिर, गणपती मंदिर, दत्त मंदिर असे मंदिर असून त्रेता युगातील रामायण काळातील माहिती  विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.  वनस्पती झाडे व निसर्गरम्य परिसर पाहून मुलांच्या अभ्यासातील ज्ञानात भर पडली .
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी निसर्ग हा आपला मित्र आहे या भावनांची जाणीव ठेवून  परिसरातील प्लास्टिक कचरा, घनकचरा साफसफाई करून परिसर चकाकून सोडला .यावेळी क्लासेसचे संचालक दीपक महाजन सर यांनी गोंणपाठ शर्यत, लिंबू चमचा शर्यत घेऊन विद्यार्थींचा आनंद द्वितीने केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने