चोपडा विद्युत मंडळाचे सहाय्यक अभियंता अमित सुलक्षणे लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात..साडेचार हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले
चोपडा,दि.१३(प्रतिनिधी): नवीन वीज मीटर बसवण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यास साडेचार हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.सदरील अभियंत्यांचे नाव अमित दिलीप सुलक्षणे (वय ३५ वर्षे, रा. प्लॉट.नं.६०-बोरोले नगर १ चोपडा), असे असून लाच स्विकारताना संशयीत लाचखोर अधिकारीस रंगेहाथ पकडण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,चोपडा तालुक्यातील तक्रारदार यांच्या घरी नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी सहायक अभियंता अमित सुलक्षणे (चोपडा शहर कक्ष २) यांनी साडे पाच हजार रुपयांची मागणी केली आणि तडजोडअंती ४५०० रुपये घेण्याचे ठरले होते. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि सहायक अभियंता अमित सुलक्षणे यांस साडेचार हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.त्यांच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई नाशिक परीक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,पर्यवेक्षण अधिकारी श्री योगेश ठाकूर व जळगाव पोलीस निरीक्षक श्रीमती नेत्रा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पो. कॉ. प्रणेश ठाकूर, पो ना मराठे, पो ना राकेश दुसाने यांच्या पथकाने केली.