अधिकारी व कर्मचाऱ्यांनो आपण सारे प्रॉब्लेम नसुन सोलुशन असल्याचे मनात बिंबवा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा सल्ला.. लोक उदय फाऊंडेशन मार्फत 42 जणांचा पुरस्काराने गौरव

 अधिकारी व कर्मचाऱ्यांनो आपण सारे प्रॉब्लेम नसुन सोलुशन असल्याचे मनात बिंबवा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा सल्ला.. लोक उदय फाऊंडेशन मार्फत 42 जणांचा पुरस्काराने गौरव

चोपडा दि.१०(प्रतिनिधी) :-शासकिय सेवा बजावणारे व्यक्ती ही खाली वा उच्च पदस्य कोणत्याही हुक्क्यावर कामगिरी बजावत असो ती व्यक्ती आप आपल्या अखत्यारीत कार्य करीत राहतात त्यामुळे आपण सारे प्रॉब्लेम नसुन सोलुशन आहोत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी येथे आयोजित सन्मान सोहळ्याप्रसंगी केले ते शासकीय कर्मचाऱ्यांना उद्देशुन बोलत होते.आज लोक उदय फौंडेशनच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी बजावऱ्यांचा सन्मान होणे म्हणजे त्या व्यक्तीला आपण काहीतरी चांगले करीतो आहे याचे समाधान मिळत असल्याचे सांगून उपक्रमाची वाह वा..! केली.

 जागतिक महीला दिवसाचे औचित्य साधत जेष्ठ महीला शिक्षीका सुमनताई भिमराव पाटील वाळकी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी माजी आमदार कैलास बापू पाटील, निवृत्त पोलिस उपायुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, माजी जि.प.सदस्य तथा लोकउदय फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील पाटील हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी फाउंडेशनमार्फत शासकीय सेवेत उत्कृष्ट कामगिरी बजावऱ्या सेवेकऱ्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यात श्रीमती विजया यशवंत पाटील(शिक्षिका) ,अरुणा सुहास देवराज (जि प शाळा बिडगाव), जगदीश सिताराम महाजन (प्राथ.आश्रम शाळा सत्रासेन), भरत भीमराव शिरसाट( जि प शाळा न्यू प्लॉट विरवाडे), पंकज प्रतापराव शिंदे (प्रताप विद्यामंदिर चोपडा), प्रवीण शांताराम माळी (प्राथमिक शाळा अजंती ),सोनाली मधुकर साळुंखे (जिप शाळा मामलदे) ईश्वर रघुनाथ राजपूत (सीबी निकुंभ विद्यालय घोडगाव), भालचंद्र शिवाजी पवार( डी आर बी माध्यमिक विद्यालय सत्रासेन), संजीव हिरामण पाटील (ग्रामसेवक वराड ),खान मुस्ताक अहमद खान सरफराज खान(शिक्षक) ,शितल रणजितसिंह जाधव( जि प मराठी शाळा नंबर 2 ),चंद्रशेखर निंबाजी सोनवणे (ग्रामसेवक पिंपळे बुद्रुक), चंद्रकांत साहेबराव सुलताने (ग्रामसेवक निशाने बुद्रुक), बापू भागवत कोळी (ग्रामविकास अधिकारी विदगाव), मनोहर पंढरीनाथ पाटील (ग्रामसेवक घुमावल तावसे ),दिनेश रमेश पाटील (ग्रामसेवक ),भैय्यासाहेब विश्वनाथ साळुंखे (ग्रामसेवक) सुधाकर शांताराम चौधरी (ग्रामसेवक ) राकेश सुभाष सोनवणे (ग्रामपंचायत अधिकारी अजंती ),पल्लवी जगतराव शिंदे जि प शाळा कुसुंबा ),राकेश राजकुमार विसपुते (विवेकानंद विद्यालय चोपडा )अर्जुन देवकीनंदन कोळी( अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय कमळगाव )किरण रघुनाथ पाटील(शिक्षक कर्जाना),माला सुखदेव सोनवणे (प्राथमिक शिक्षिका कुसंबे )संजय हरी पाटील( गुरुदेव विद्यालय कोळंबा) सुनीता भाईदास पवार (जि प शाळा खडगाव )पठाण नईम खान युसुफ खान (जि प उर्दू शाळा नंबर 4) दीपक वसंत मेढे (शरचंद्रीकाआक्का माध्यमिक आश्रमशाळा करजाना) दिनेश नारायणराव बाविस्कर (महात्मा गांधी विद्यालय चोपडा) महेंद्र योगराज महाजन (कृषी पर्यवेक्षक चोपडा )जितेंद्र वसंतराव सनेर (कृषी पर्यवेक्षक अडावद )नरेंद्र धोंडू जाधव (कृषी पर्यवेक्षक हातेड )कैलास अजय देशपांडे (कृषी सहाय्यक गोरगावले )विलास भगवान मोरे (कृषी सहाय्यक  अनवरदे) राजेंद्र सुरेश निकम (कृषी सहाय्यक कमळगाव )दीपक चंद्रसिंग पाटील (माध्यमिक विद्यालय नागलवाडी )जितेंद्र एकनाथ धनगर (कोतवाल चोपडा)  कुंदन उत्तम कुमावत (ग्रामविकास अधिकारी वर्डी) डी आर सैंदाणे (नायब तहसीलदार)  सचिन कुमार वाबळे (निवडणूक नायब तहसीलदार ),विपुल दिलीप पाटील (वन परिमंडळ अधिकारी) मान्यवरांचा समावेश आहे.या पुरस्कार्थींचा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी शासकीय व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने