अकोले-परेल एस.टी बस अचानक बंद प्रवासींमध्ये प्रचंड संताप...! बस चालू करण्याची सामाजिक कार्यकर्ते विशाल कुरकुटेंची मागणी
ठाणे, दि.७(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे अकोले - परेल बस अचानक बंद झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली असून गैरसोय होत असल्याने संतापाची लाट पसरली आहे . बस त्वरित चालू न केल्यास जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विशाल कुरकुरे यांनी दिला आहे.
मागील दोन ते तीन महिन्यांपासून अकोले ते परेल लालपरी अचानक बंद करण्यात आली आहे आपले गाव सोडून उदारनिर्वाह करण्यासाठी मुंबई-ठाणे येथे अनेक जण अप- डाऊन करीत असतात तसेच शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, गरोदर महिला यांचा दैनंदिन प्रवास रोजच चालू असतो. पठार अकोले, कोतुळ, ब्राह्मणवाडा,बेलापूर, बोटा पंचक्रोशीतील असंख्य ग्रामस्थांच्या हक्काचे वाहन म्हणून लाल परीला विशेष प्राधान्य आहे.अकोले आगारावरून परेलच्या दिशेने रवाना होणारी लालपरी कोणतेही सूचना न देता अचानक बंद केली आहे. त्यामुळे ब्राह्मण वाड्याच्या पूर्वेकडील परिसरातील चैतन्यपूर, बदगी बेलापूर, जाचकवाडी म्हसवांडी, कुरकुटवाडी, आबिफाटा परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अकोले वरून सुटणारी ही गाडी बेलापूर-बोटा आळेफाटा मार्गे मुंबईच्या दिशेने रवाना होत होती. सदर गाडी पुन्हा चालून झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात असा इशारा गावातील ग्रामस्थांनी दिला आहे.