पुन्हा जुळला स्नेह,एकत्र आले माजी वर्गमित्र एम.जे.कॉलेजचे अर्थशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी 38 वर्षानंतर स्नेहसंमेलनासाठी एकत्र
गणपूर(ता चोपडा)ता 6(प्रतिनिधी): जळगाव च्या एम. जे. कॉलेजात 1986 /87 मध्ये एम ए अर्थशास्त्र शिकणारे विद्यार्थी ३८ वर्षानंतर एकत्र येत मेहरून तलावाजवळील व्हेज अरोमा या हॉटेलात स्नेह मिलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. अर्थशास्त्र विभागाचे माजी प्रा.चारुदत्त गोखले, प्रा. डॉक्टर एस डी जोशी ,माजी प्राचार्य डॉ. आर डी राणे अतिथी म्हणून आमंत्रित होते.
सुरुवातीला सर्व अतिथिंचे स्वागत करण्यात आले. प्राचार्य डॉ आर डी राणे यांचे स्वागत शाल आणि पुष्पगुच्छ देऊन माजी विद्यार्थिनी विजया अमृतकर यांनी केले. प्रा चारुदत्त गोखले यांचे स्वागत माजी विद्यार्थी गंगाराम पाटील यांनी केले तर प्रा डॉ एस डी जोशी यांचे स्वागत माजी विद्यार्थी प्रा एस डी पाटील यांनी केले.
38 वर्षानंतर सगळेजण एकत्र आल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता. या स्नेह मिलन प्रसंगी अतिथी प्राध्यापकांनी त्यावेळच्या कॉलेजच्या आठवणींना उजाळा दिला. आणि आजही विद्यार्थी आम्हाला विसरलेले नाहीत असे आनंद उद्गार काढलेत.
याप्रसंगी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून देत आपण कुठल्या पदावर होतो हे देखील सांगितले. आणि त्याचप्रमाणे प्राध्यापक मंडळी आणि महाविद्यालया प्रति आदरयुक्त भाव आपल्या भाषणातून व्यक्त केला.
या स्नेहमिलनप्रसंगी एकत्रित आलेल्या माजी विद्यार्थ्यांमध्ये निवृत्त प्राध्यापिका नीता वाणी, प्राध्यापिका छाया करकरे, माजी मुख्याध्यापक एम आर पाटील, प्रकाश भावसार ,नरेंद्र मगर ,माजी प्राध्यापक डी एस पाटील ,सुषमा यादव, विजया काळे, ललिता चौधरी, संध्या चौधरी, कल्पना पाटील ,निवृत्त शिक्षिका विजया अमृतकर, निवृत्त शिक्षक गंगाराम पाटील, माजी विद्यार्थी आणि सध्या पत्रकार असलेले शब्बीर सय्यद आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे निवृत्त वरिष्ठ उद्घोषक प्रमोद बाविस्कर यांनी केले, यावेळी स्नेहभोजन आणि सोबत आठवणींच्या गप्पा मनमुराद रंगल्या. पुढच्या वर्षी मनुदेवीच्या निसर्गरम्य परिसरात हा स्नेहा मिलन कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी माजी विद्यार्थी एम आर पाटील यांनी स्वीकारली. आणि सगळ्यांना आतापासूनच आमंत्रण दिलं. अगदी भरल्या अंतकरणाने पाहुण्यांना निरोप दिल्यानंतर पुढल्या वर्षी भेटूया असं म्हणत प्रत्येकाने एकमेकांचा निरोप घेतला.