अकुलखेडा नेहरू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतले मेडिटेशनचे धडे.. अन् नारळापासून बनविलेल्या शिवलिंगांचे घडले दर्शन
चोपडा दि.२७(प्रतिनिधी)अकुलखेडा येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी प्रजापिता ब्रह्मकुमारी ओम शांती केंद्रातर्फे तयार करण्यात आलेल्या ११हजार १०१ नारळाच्या शिव पिंडाचे दर्शन "आज दि.२७फेब्रुवारी रोजी घेऊन अध्यात्मिक ज्ञान प्राप्त केले .
प्रजापिता ब्रह्मकुमारी ओम शांती केंद्राने महाशिवरात्री निमित्त हे शिवलिंग मोठ्या मेहनतीने तयार करून दर्शनासाठी तीन दिवस खुले ठेवले आहे त्याअनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांना अध्यात्मिक माहिती प्राप्त व्हावी शिवाय देवदर्शन घडावे उद्देशाने शाळेने विद्यार्थ्यांना या केंद्राच्या भेटीसाठी आणले असता केंद्रातील मंगलादिदी यांनी विद्यार्थ्यांकडून काही स्मरणशक्ती वाढविण्यासाठी मेडिटेशन व वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करून घेतल्या व आध्यात्मिक मार्गदर्शन केले .
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी एस पाटील सर, श्री राहुल पाटील सर, श्री अतुल पाटील सर व श्री उमेश पाटील आदी उपस्थित होते.