गणपूर येथे शिवपूराण कथा सप्ताहाला सुरुवात ..बाळकृष्ण दीक्षित करणार कथा वाचन

 गणपूर येथे शिवपूराण कथा सप्ताहाला सुरुवात ..बाळकृष्ण दीक्षित करणार कथा वाचन 


गणपूर (ता चोपडा) ता 5 प्रतिनिधी:येथे ग्रामपंचायत चौकात काल(ता 4) पासून समस्त ग्रामस्थ मंडळी गणपूर यांच्या मार्फत भव्य संगीतमय श्री शिव पुराण कथा सप्ताहाला सुरुवात झाली. येत्या 10 फेब्रुवारी रोजी या शिवपुराण कथा सप्ताहाचा समारोप होईल
.
 

कथा प्रवक्ता हभप बाळकृष्ण महाराज दीक्षित गणपूरकर हे कथेचे वाचन करणार असून रात्री आठ ते अकरा वाजे दरम्यान या संगीतमय कथेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कथेला सुरुवात होण्यापूर्वी गावातून संगीताच्या तालावर व सजवलेल्यामध्ये कथा प्रवक्ता व शिवपुराण ठेवून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. मिरवणुकीत कुमारीकांनी विविध धार्मिक गीतांवर थीरकत या मिरवणुकीचा आनंद लुटला. मोठ्या आनंदाने सुरुवात होत असलेल्या या कथेला परिसरातील मलखानगर, अनेर धरण, मराठे,भवाळे, गलंगी, वेळोदे, घोडगाव, हीसाळे, अजनाड,बभळाज,तरडी येथील भावीकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे......

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने