चोपड्याचे चित्रकार अनिलराज पाटलांच्या चित्रांची दखल.. पेन इंकचे पाच चित्रे ८ फेब्रुवारीला लातुरच्या प्रदर्शनात
चोपडा दि.५(प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती व रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान उदगीर जिल्हा लातूर यांच्या संयुक्त विद्यामानाने एक दिवसीय 3 रे चित्र संमेलन आयोजित करून चित्रकारांना व्यासपीठ तयार करून दिले आहे. या रंगकर्मी चित्र प्रदर्शनामध्ये चित्रकारांची चित्रे लावण्यात येणार आहेत.संयोजक शिवाजी हांडे सर, महादेव खुरळे सर यांनी चित्रकारांना चांगली संधी उपलब्ध करून दिली. चोपड्याचे चित्रकार अनिलराज पूनमचंद पाटील यांच्या पाच चित्रांची निवड करण्यात आली असून यात महाराष्ट्रातून नामवंत चित्रकाराचा मध्ये समावेश आहे.
हे चित्र प्रदर्शन आठ फेब्रुवारी 2025 रोजी सुरू होत आहे, यात अनिलराज यांची शिवांश, शिवरुद्र, शुलपाणी, शिवकल्याण राजा,शेतकऱ्या चा कैवारी असे हे पाच चित्र लावन्याय येणार आहे.ही चित्रे भगवान शंकर ,श्री गणेश, छत्रपती शिवाजी महाराज यांचि असून ती पेन इंक तयार केली आहे या प्रदर्शनात प्रत्येक चित्रकारांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे, अनिलराज यांचे कौतक होत असून शुभेच्छा देण्यात आल्या.,अनिलराज हे ललित कला महाविद्यालय चोपडा चे माजी विध्यार्थी आहेत. माजी प्राचार्य राजेंद्र महाजन सर,प्राचार्य बारी सर ,प्रा. नेवे सर, प्रा. पाटील सर, लिपिक भगवान बारी, अतुल अडावद कर, प्रवीण मानकरी, गुरुवर्य चित्रकार चंद्रशेखर कुमावत सर पुणे,शिवचरित्रकार मिलिंद विचारे पुणे, मित्र परिवार, रवी कला,दीप स्टुडिओ चे प्रकाश राजपूत सर, सादिक शेख यांनी शुभेच्छा दिल्या.