निकालाची परंपरा टिकवत शाळेचे नाव मोठे करा..संजयराव गरुड यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
गणपूर (ता चोपडा )ता 4. (प्रतिनिधी): येथील विकास माध्यमिक विद्यालयाच्या एसएससी च्या परीक्षेच्या निकालाची शंभर टक्के असलेली परंपरा कायम ठेवत विद्यार्थ्यांनी अधिकाधिक गुण मिळवून शाळेचे,व पालकांचे नाव मोठे करावे असे आवाहन शेंदुर्णी एज्युकेशन सहकारी सोसायटी चे अध्यक्ष संजयराव गरुड यांनी एसएससी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाला संस्थेचे सहसचिव यु यु पाटील ,पत्रकार शेतीमित्र ऍड. बाळकृष्ण पाटील, संपर्कप्रमुख एम बी पाटील, अंबादास सिसोदिया, भवाळ्याचे सरपंच आनंदराव पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेत सर्व सुविधा उपलब्ध असून शिक्षकांनी वर्षभर मेहनत घेतली आहे. आता कसोटी विद्यार्थ्यांची असून त्यांनी जिद्द आणि आत्मविश्वास ठेवत परीक्षेला सामोरे जावे असे मत ऍड. बाळकृष्ण पाटील यांनी मांडले. यु यु पाटील यांनी शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असून सर्व सुविधा व शिक्षण आणि संस्कार देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले .अंबादास सिसोदिया यांनीही मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक पी एस पाटील यांनी प्रास्ताविक केले. वर्ग शिक्षक ए बी सूर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनीही यावेळी मते मांडली. आर टी सावकारे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला संजय पाटील, प्रदीप पाटील, अरुण पाटील, गणेश पाटील, परेश पाटील, विनोद पाटील, बाबुराव पाटील, विजय भावसार, सुनंदा पाटील, संजय पाटील ,विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षणप्रेमी उपस्थित होते.
गणपूर (ता चोपडा )दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप प्रसंगी शुभेच्छा देत्यांना संस्थेचे चेअरमन संजयराव गरुड