चोपडा नागलवाडी रोडवर गांजा या आम्ली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
चोपडा दि.३(प्रतिनिधी) :-चोपडा नागलवाडी रोडवर गांजा या आम्ली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे
याबाबत प्राप्त माहिती अशी की,दि.०२/०२/२०२५ रोजी १८.५० वाजता चोपडा शहरातील नागलवाडी रोडावरील वराड येथे १) १,४५,०००/- रु. कि.चा १४ किलो ५१० ग्रॅम वजानाचा हिरवट रंगाचा उग्र वास येत असलेला पाने, फुले, बिया, असलेला गांजा हा कापड झोला पिशवी मध्ये भरलेला कि.अ.
२)१०००/- रु रोख त्यात ५००/- रु दराच्या २ भारतीय चलनी नोटा
३) १०००/- रु.कि.चा नोकीया कंपनीचा काळ्या रंगाचा त्याचा IMEI नंबर 3579114119095806 असा असलेला त्यात एअरटेल कंपनीचे सिम कार्ड नं. 9503261720 हा माल घेऊन ) रोहीत संजय शेळके, वय-२५ रा परळीरोड, उड्डाणपुला जवळ भिमनगर, परभणी ता. जि. परभणी,
२) तुळशीराम फचरु अव्हाडे, वय २० वर्ष रा. परळीरोड, उड्डाणपुला जवळ भिमनगर, परभणी ता. जि.परभणी, वरील आरोपी मजकुर याने त्यांच्या कब्जात १४ किलो ५१० ग्रॅम वजनाचा गांजा हा मनोव्यापारावर परिणाम करणारा प्रतिबंधीत अंमली पदार्थ बाळगतांना मिळून आले म्हणुन त्याचे विरुध्द चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे पोकॉ गजेंद्र भास्कर ठाकुर वय ३८ वर्ष चोपडा शहर पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे भाग- ६ CCTNS गुरनं. ३६/२०२५ गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम ८ (क), २० (ब), (२), २२(ब), गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पोनि मधुकर साळवे चोपडा शहर पोस्टे सपोनि एकनाथ भिसे चोपडा शहर पोस्टे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनि अनिल भुसारे चोपडा शहर पोलिस स्टेशन हे तपास करीत आहेत