वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी 'रामराजच्या' दालनात युनिक खरेदी

 वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी 'रामराजच्या' दालनात युनिक खरेदी



चोपडा,दि.३(प्रतिनिधी) - येथे सुरु असलेल्या रोटरी उत्सवाच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व पुरस्कार वितरण कार्यक्रमाला राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना.संजय सावकारे यांनी उपस्थिती दिली.यावेळी त्यांनी विशेष करुन मनोरम एन एक्स या रेडीमेड क्षेत्रातील फर्मने सुशोभित केलेल्या 'रामराज' या साऊथ इंडीयन कॅाटन ब्रॅडच्या स्टॅालला भेट दिली.

'रामराजच्या' ब्रॅडच्या उत्पादनांबाबत माहिती जाणून घेतली.एवढेच नव्हे तर आपल्याला आवडलेल्या शर्टस वा इतर उत्पादनांची खरेदी देखील केली.यावेळी ना.सावकारे यांचे स्वागत 'मनोरम' चे सागर नेवे,सौरभ नेवे व पत्रकार श्रीकांत नेवे यांनी केले.याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राचार्य ईश्वर सौंदाणकर,उपप्रांतपाल नितिन अहिरराव,माजी अध्यक्ष व उद्योजक आशिष गुजराथी,भाजपचे माजी जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे,बबनराव पाटील यांचे सह अनेक मान्यवर हजर होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने