जळगाव शासकीय बहुउद्देशीय दिव्यांग संमिश्र केंद्राची विद्यार्थ्यांची मंगळग्रह मंदिरावर शैक्षणिक सहल संपन्न


जळगाव शासकीय बहुउद्देशीय दिव्यांग संमिश्र केंद्राची विद्यार्थ्यांची मंगळग्रह मंदिरावर शैक्षणिक सहल संपन्न

जळगाव,दि.३(प्रतिनिधी)-शासकीय बहुउद्देशीय दिव्यांग संमिश्र केंद्र,जळगाव येथील दिव्यांग विदयार्थ्यांची दिनांक-31/01/2025 रोजी अमळनेर येथील प्रसिद्ध मंगळग्रह मंदिर येथे दर्शन घेतले. तेथील उदयानात विदयार्थ्यांनी  निसर्गरम्य वातावरणात आनंद साजरा केला.

विदयार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा त्यांना मायेची उब मिळावी या करीता या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच अमळनेर येथील पोलिस निरीक्षक-श्री. विकास देवरे सरांनी संमिश्र केंद्रातील विदयार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीच्या उपक्रमास शुभेच्छा देवून विदयार्थ्यांचे कौतुक व  सत्कार करण्यात आला.

तसेच  PI-श्री.देवरे साहेबांनी विदयार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.त्यानंतर धरणगाव संमिश्र केंद्राचे कर्मचारी-अक्षय महाजन यांच्या शेतातील दत्तगुरु मंदिर परिसरात  दिव्यांग विदयार्थ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला.

सदरील शैक्षणिक सहल ही शासकीय बहुउद्देशीय दिव्यांग संमिश्र केंद्रातील वर्ग-2-अधिक्षक-डॉ.श्री.किरण शिरसाठ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.यावेळी-अक्षय महाजन, डॉ.श्री. किरण शिरसाठ,रमजान तडवी, राजेंद्र ठाकूर, MSW-प्रशिक्षणार्थी- निलेश बोरा,पुष्पा ठाकूर आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने