शिरपुरला साधना स्वयं सहायता समूहाने खाद्यपदार्थ नॉनव्हेज जेवण विक्रीचा लावला स्टॉल
शिरपुर दि.७(प्रतिनिधी)आज दिनांक-07-02-2025 रोजी पंचायत समिती शिरपूर येथे वनावल प्रभागातील गिधाडे गावातील साधना स्वयं सहायता समूहाने खाद्यपदार्थ नॉनव्हेज जेवण विक्रीचा स्टॉल लावण्यात आला. विक्री करिता मच्छी फ्राय, ग्रेवी, सोयाबीन चिल्ली, चपाती सलाड असे विविध पदार्थ विक्री करता ठेवण्यात आले.
तालुका कक्षातील तालुका अभियान व्यवस्थापक रामचंद्र पाटील , नरेंद्र पाटील , शब्बीर पावरा सर, चेतन पावरा उपस्थित होते.अशी माहिती प्रभाग समन्वयक दत्तात्रय खराडे वनावल प्रभाग-शिरपूर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.